मुझफ्फरनगर वृत्तसंस्था – वादग्रस्त विधानं करण्याच्या आपल्या सवयीमुळे नेहमी चर्चेत असलेले भाजप आमदार विक्रम सैनी पुन्हा बरळले. त्यांनी काश्मीरमधील कलम ३७० हटविल्याबद्दल स्वागत करत असताना एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता चांगलीच टीका होऊ लागली आहे. एका बॉलीवूड अभिनेत्रीने त्यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला आहे.
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचं विभाजन करत जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी एक मुझफ्फरनगर येथे कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी सैनी हे तेथे प्रमख पाहुणे होते.
काय म्हणाले सैनी ?
देशातील मुस्लीमांनी आता खुश व्हायला पाहिजे. कारण ते आता न घाबरता गोऱ्या काश्मीरी मुलींशी लग्न करू शकतात. एवढंच नाही तर भाजपचे अविवाहित नेतेही काश्मीरला जमीन खरेदी करू शकतात. आणि लग्न करू शकतात.
भाजपमध्ये जेवढे अविवाहित नेते आहेत. ते सर्व काश्मीरला जाऊन लग्न करू शकतात. आम्हाला काही आक्षेप नाही. एवढंच काय तर भाजपच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनीही खुश व्हायला पाहिजे. कारण ते आता गोऱ्या मुलींशी लग्न करू शकतात.
Muzaffarnagar BJP MLA Vikram Saini on abrogation of Article 370.
"Muslim karyakartas sitting here should be celebrating. Marry "gori ladki" from Kashmir now" pic.twitter.com/tRhZXy8IZq
— Piyush Rai (@Benarasiyaa) August 6, 2019