नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहारच्या एका सभेत, अर्णब गोस्वामी हे एक मोठे पत्रकार असून आपल्या स्वार्थासाठी अटक करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला काँग्रेसने हल्ला केला आहे. असे म्हटले आहे. मात्र, यापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी एका टीव्ही शोमध्ये त्यांना अशिक्षित आणि पागल म्हटले होते. यासंदर्भात समाजवादी पक्षाचे प्रवक्ता पवन पांडे यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत, ‘क्या से क्या हो गया देखते-देखते,’ असे म्हटले आहे.
पवन पांडे यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये मुंख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या भाषणाचा काही भाग आहे. यात ते काँग्रेसवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करत आहेत. यात आदित्यनाथांनी म्हटले आहे,
‘१९७५मध्ये काँग्रेसने आणीबाणी लादली होती आणि आजच आपण पाहिले असेल, की देशातील एका फार मोठ्या पत्रकाराला आपल्या स्वार्थासाठी अटक करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. अर्णब गोस्वामी यांच्या त्या टीव्ही शोचाही काही भाग दाखवण्यात आला आहे. यात अर्णब गोस्वामी म्हणाले होते, ‘योगी आदित्यनाथ तर असे व्यक्ती आहेत, त्यांना धर्माच्या बाबतीत काही माहीतच नाही. असे अशिक्षित व्यक्ती आहेत, की कुणी सांगायला हवे, आपण आपले मेंटल बॅलेन्स चेक करून घ्या.