मुंबई न्यूज (Mumbai News) : बहुजननामा ऑनलाईन – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं (CSIR) एक महत्वाचा खुलासा केला असल्याचं समोर आलं आहे. धूम्रपान अथवा तंबाखू (Smoking or tobacco) खाणाऱ्या लोकांना कोरोनापासून धोका नसल्याचा खुलासा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं केलाय. CSIR ने केलेल्या अभ्यासामधून एका रिपोर्टनुसार माहितीचा खुलासा केला आहे. यामध्ये तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थातील निकोटीन नावाचा पदार्थ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी ठरत आहे. मात्र, या रेपोर्टवरून काही तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थांची विक्री करणारे व्यापारी आणि विक्रेत्यांनी हाय कोर्टात (High Court) धाव घेतलीय. म्हणून तंबाखुजन्य (Tobacco) पदार्थ सेवन केल्याने कोरोनाला रोखू शकतो का ? यावरून एक गोंधळ निर्माण झालं आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) दाव्यानुसार तंबाखूमधील निकोटीन हा घटक कोरोनाला रोखण्यास करण्यास परिणामकारक ठरतो, या CSIR च्या दाव्यावरून अहवालाचा दाखला देत तंबाखूजन्य पदार्थांचे व्यापारी आणि विक्रेत्यांनी मंगळवारी (29 जून) मुंबई हाय कोर्टात (High Court) धाव घेतली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या रिपोर्टनुसार तंबाखू कोरोना विषाणूला रोखण्यास मदत करत असेल तर भारतात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणली जाऊ नये, अशी मागणी तंबाखूजन्य पदार्थांचे व्यापारी आणि विक्रेत्यांनी मुंबई हाय कोर्टात (High Court) केलीय.
या दरम्यान, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) रेपोर्टच्या दाव्यामध्ये तथ्य असल्यास केंद्र सरकारनं सिगारेटच्या पाकिटांवरून आरोग्यासंदर्भात वैधानिक इशारा हटवायला हवा, असा टोला मुबई हाय कोर्टानं (High Court) लागावला आहे. मात्र, तूर्त वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) अजून देखील कुठलंही स्पष्टीकरण दिलं नसल्यानं तंबाखू खाणारे कोरोनापासून खरंच सुरक्षित आहेत का? असा एक संभ्रम निर्माण झाला आहे.
Web Titel : are smoker safe from corona virus big revelation from csir report high court appeal
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update