बहुजननामा ऑनलाइन – गुगलने आज भारताच्या दिवंगत जलतरणपटू आणि ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणार्या आरती साहा यांचा डुगलच्या माध्यमातून गौरव केला आहे. आज आरती जिवंत असत्या तर त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत असत्या. आरती यांनी 29 सप्टेंबर 1959 रोजी इंग्लीश खाडी पोहून जाण्याचा विक्रम केला होता. असा विक्रम करणार्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या.
आरतीने फ्रान्समधील केप ग्रिझ नॅझ ते इंग्लंडमधील सॅण्डगेटदरम्यानचे 42 मैलांचे अंतर पोहून पार केले होते. कोलकात्यामधील बंगली कुटुंबामध्ये आरती यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना पोहण्याची आवड होती. त्यामुळेच त्यांनी आयुष्यातील पहिले सुर्वण पदक वयाच्या पाचव्या वर्षीच जिंकले होते. 11 व्या वर्षांपर्यंत आरती या जलतरणपटू म्हणून उदयास आल्या. गुगलच्या होमपेजवर झळकणारे आजच्या डुडलवरील चित्र हे कोलकात्यामधील कलाकार लावंण्या नायडू यांनी काढले आहे.
आयुष्यात कितीही संकटे आली तरी मोठी स्वप्न पाहणार्यांना हे चित्र प्रेरणा देईल अशी अपेक्षा लावंण्या यांनी व्यक्त केली आहे. जलतरणपटू म्हणून लहान वयामध्येच आरती यांनी अनेक सन्मान मिळवले. यामध्ये 1949 साली भारतातील सर्वात वेगवान जलतरणपटू म्हणून नाव नोंदवणे, 1951 मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये डॉली नाझीर यांचे सर्व विक्रम मोडीत काढणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. 1951 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्यांमध्ये आरती आणि डॉली दोघीही होत्या.