नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या मध्यवर्ती क्षेत्र शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. त्यामुळे आता जे विद्यार्थी 12 वी उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांनी एखाद्या कोर्ससाठी प्रवेश घेतला असेल तर त्यांना 10 ते 20 हजारांची शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे. देशभरातील 82 हजार(41 हजार मुलं, 41 हजार मुली) विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.
यातील आरक्षण कसं असेल ? किती शिष्यवृत्ती मिळणार ?
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. संबंधित अर्जदाराचा त्या मंडळाच्या 80 टक्क्यामध्ये समावेश असणे गरजेचे आहे. यामध्ये एससीसाठी 15 टक्के, ओबीसीसाठी 27 टक्के, एसटीसाठी 7.5 टक्के तर दिव्यांगांना 5 टक्के आरक्षण मिळणार आहे. जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट कोर्स करत आहेत त्यांना वर्षाला 10 हजार तर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सला असणाऱ्यांना वर्षाला 20 हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे.
काय आहे पात्रता ?
पात्रता – ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल कारण असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील.
जुन्या शिष्यवृत्तीचे नूतनीकरण
महत्त्वाची बाब अशी की, ज्या विद्यार्थ्यांना आधी शिष्यवृत्ती मिळाली आहे असे विद्यार्थीदेखील या शिष्यवृ्त्तीसाठी अर्ज करू शकतात. परंतु त्यांनी गेल्या वर्षात किमान 60 टक्के गुण मिळवलेले असावेत. इतकेच नाही तर त्यांची 75 टक्के हजेरीही गरजेची आहे. महत्त्वाचं म्हणजे त्या संबंधित विद्यार्थ्यावर रॅगिंगसारखे कोणतेही आरोप नसावेत.
कोणत्या बोर्डात किती विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती ?
CBSE- 5413 ICSE- 577, आंध्र प्रदेश- 3527
अरुणाचल प्रदेश- 77, आसाम- 2002, बिहार- 5624
छत्तीसगढ- 1387, दिल्ली- 1591, गोवा-113
गुजरात- 3944, हरियाणा- 1591, हिमाचल- 461
जम्मू काश्मीर- 768, झारखंड- 1878, कर्नाटक- 4237
केरळ- 2324, महाराष्ट्र- 7417, मध्य प्रेदश- 4299
मणिपूर- 181, मेघालय- 166, मिझोराम- 75
नागालँड- 176, उडीसा- 2736, पंजाब- 1902
राजस्थान- 3978, सिक्किम- 44, तमिळनाडू- 4883
तेलंगना- 2570, त्रिपुरा- 236, उत्तर प्रदेश- 11460
उत्तराखंड- 616, पश्चिम बंगाल- 5941, अंदमान- 31
चंदीगढ- 82, दादरा- 21, दमन- 19, लक्षद्वीप- 04, पाँडिचेरी-78
कसा कराल शिष्यवृत्तीसाठी अर्ज ?
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://scholarships.gov.in/ या शिष्यवृत्तीच्या वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी स्टुडेंट्स हा पर्याय निवडा. शिष्यवृ्त्तीचा सर्व तपशील तु्म्हाला इथे पहायला मिळेल. तुम्हाला होमपेजवरील न्यू रजिस्ट्रेशनवर या बटनावर क्लिक करायचे आहे. जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉग ईन करून तुम्ही अर्ज भरू शकता.
Visit : bahujannama.com