नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचे मोठे गिफ्ट दिले आहेत, बुधवारी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली की कॅबिनेट कर्मचाऱ्यांच्या डीए म्हणजेच महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे, ते म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट देण्यात येईल. कॅबिनेटने महागाई भत्त्यात 5 टक्क्यांने वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
Union Minister Prakash Javadekar: Under leadership of Prime Minister Modi, several decision have been taken and good news for govt employees is that Dearness Allowance has been hiked by 5%. pic.twitter.com/P08ZnEcDIC
— ANI (@ANI) October 9, 2019
या निर्णयाचा फायदा 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 62 लाख पेंशनधारकांना होणार आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 16,000 कोटी रुपयांचा बोझा पडेल. आता महागाई भत्ता 12 टक्क्यांनी वाढून 17 टक्के झाला आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आधार कार्ड अनिवार्य सीडिंगची डेडलाइन वाढवून 30 नोव्हेंबर करण्यात आली आहे. आता लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आपले खाते आधारला लिंक करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी मिळणार आहे.
Visit : bahujannama.com