उस्मानाबद : बहुजननामा ऑनलाईन – Anti Corruption Trap| अंगणवाड्यांना दिलेल्या गॅस कनेक्शनचे 5 लाख 64 हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना परांडा येथील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला (Child Development Project Officer Paranda) उस्मानाबाद (osmanabad) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून (Anti Corruption Trap) रंगेहाथ पकडले. नारायण दशरथ गायके (Narayan Dashrath gayake) असे अटक करण्यात आलेल्या प्रकल्प अधिकाऱ्याचे नाव असून ही कारवाई (Anti Corruption) रविवारी सुट्टीच्या दिवशी करण्यात आली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पैशाचा मोह आवरला नाही
विशेष म्हणजे एका गरीब कुटुंबातून संघर्ष करत गायके यांनी प्रशासकीय सेवेत (Administrative service) नोकरी मिळवली होती. पण अधिकारी झाल्यानंतर त्यांना पैशाचा मोह आवरता आला नाही. अंगणवाड्यांना (Anganwadi) दिलेल्या गॅस कनेक्शनचे (Gas connection) बिल काढण्यासाठी ही लाच घेतली. गायके यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गायके यांना लाच स्वीकारण्याचा मोह रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा आवरता आला नाही.
प्रति गॅस कनेक्शन 563 रुपये 50 पैसे लाच
शासनाच्या योजनेप्रमाणे, तालुक्यातील अंगणवाड्यांना गॅस कनेक्शन देण्याचं काम एका एजन्सीला देण्यात आलं आहे. या एजन्सीला 6 हजार 533 रुपये प्रतिगॅस प्रमाणे कंत्राट देण्यात आले आहे. संबंधित एजन्सीनं तालुक्यातील 86 अंगणवाड्यांना गॅस कनेक्शन दिले आहे. या कामाचे 5 लाख 61 हजार 461 रुपये एवढं बिल आलं होतं. पण आरोपी अधिकारी नारायण गायके याने प्रति गॅस कनेक्शन 563 रुपये 50 पैसे लाच मागितली. यानुसार 86 गॅस कनेक्शनचे एकूण 48 हजार 461 रुपयांची मागणी गॅस एजन्सीकडे केली. पण तडजोड केल्यानंतर आरोपी गायके यांनी 40 हजार रुपये लाच मागितली.
तक्रारदार यांनी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने सापळा रचून गायके यांना तक्रारदार यांच्याकडून 40 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 32 वर्षीय नारायण गायके गेल्याच वर्षी प्रशासकीय सेवेत भरती झाले होते. पण पैशाचा मोह त्यांना आवरता न आल्याने त्यांना तुरुंगात जाण्याची वेळ आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडीत,
पोलीस उप अधीक्षक प्रशांत सापते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे,
पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके यांच्या पथकाने केली.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी,
असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
Web Title : Anti Corruption Trap | child development project officer arrested for taking bribe in osmanabad
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Central Universities CET | UGC ची मोठी घोषणा ! केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द
Aurangabad Crime | लष्करी छावणीतील झाडाला गळफास घेत जवानाची आत्महत्या; प्रचंड खळबळ
Google Chrome चा वापर करणार्यांनी व्हावे सावध, ताबडतोब करा हे काम अन्यथा होईल मोठे नुकसान