नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Anti Corruption | दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी रिक्षाचालकामार्फत 27 हजार रुपयाची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह रिक्षाचालकाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption) सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.1) करण्यात आली आहे. जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत (Jaikheda police station) नामपुर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मुरलीधर नवगिरे (PSI Milind Muralidhar Navgire) आणि रिक्षाचालक रमेश करचु गरुड (रा. काकडगाव ता. बागलाण, जि. नाशिक) असे लाच घेताना (Accepting Bribe) रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी नामपुर येथील तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्यावर जायखेडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस दुरक्षेत्र नामपुर येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये (FIR) कारवाई न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मिलंद नवगिरे यांनी 30 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये 27 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यानी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता नवगिरे यांनी लाचेची रक्कम रिक्षाचालक रमेश गरुड याच्याकडे देण्यास सांगितली. त्यानुसार बुधवारी सापळा रचून रिक्षाचालक रमेश गरुड याला पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे यांच्यासाठी 27 हजार रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांविरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
Web Title : Anti Corruption | PSI Milind Muralidhar Navgire and Rickshaw driver arrested by acb nashik while taking bribe of 27000
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Maharashtra Lockdown | राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती