मुंबई न्यूज (Mumbai News) : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (Anti Corruption Bureau) केलेल्या एका चौकशीत मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक शंकर पुजारी (Police Inspector Shankar Pujari) हा अडचणीत सापडला आहे. पोलीस निरीक्षक शंकर पुजारीने मागील 15 वर्षांत 16 लाख 90 हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने Anti Corruption Bureau केलेल्या चौकशी दरम्यान उघडकीस आले आहे. याप्रकरणावरून ACB चे पथक अधिक तपास करीत आहे. Anti Corruption Bureau। police inspector collects unaccounted assets worth rs 17 lakh
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अधिक माहिती अशी, ACB ने दिलेल्या माहितीनुसार की, शंकर पुजारी हा सध्या मध्य नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत आहे.
तर मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये (Mulund Police Station) कार्यरत असताना 2015 रोजी पीआय पुजारीने तक्रारदार यांच्याकडे क्लब सुरू करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
ACB च्या पथकाने याप्रकरणी सापळा रचून शंकर पुजारीला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.
या दरम्यान, या प्रकरणानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शंकर पुजारीची चौकशी सुरु केली होती.
शंकर पुजारीने 1 जानेवारी 2 हजार ते 24 नोव्हेंबर 2015 या सेवा कालावधीमध्ये एकूण उत्पन्नापेक्षा 28.57 टक्के जास्तीची मालमत्ता जमा केली आहे.
शेवटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक शंकर पुजारीविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
Web Title : Anti Corruption Bureau। police inspector collects unaccounted assets worth rs 17 lakh
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Covid-19 | उत्तर प्रदेशात मल्टीफ्लेक्स, जीम, स्टेडियम खुली तर कर्नाटकात मंदिरे उघडली