जालना (Jalna) : बहुजननामा ऑनलाईन – जालना जिल्ह्यातील (Jalna district) बदनापूर तालुक्यातील (Badnapur taluka) कुंभारी शिवारात बेपत्ता तरुणाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला आहे. मृत तरुण हा बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव सायगाव (Dongargaon Saigaon) येथील रहिवासी असून त्याची फिल्मी स्टाईल हत्या (Murder in Jalna) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी (दि.3) कुंभारी शिवारातील भागवत बिडे (Bhagwat Bide) यांच्या शेतातील एका पडक्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. जालन्यात घडलेल्या या खुनाच्या (Murder in Jalna) घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
शिवाजी बाबासाहेब पितळे (Shivaji Babasaheb Pitle) (रा. डोंगरगाव सायगाव, ता. बदनापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, शिवाजीचा घातपात केल्याचा आरोप नागरिकांनी करुन काही काळ मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांनी दोन तास नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर मृत शिवाजीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरु केला आहे.
चोरीच्या संशयातून खून केल्याचा दावा
याप्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. परंतु मृत शिवाजी पितळे याच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. मृत शिवाजीला चार अज्ञात युवकांनी विद्युत पंप चोरीच्या संशयातून मारहाण करुन त्याची हत्या केली (Beat and Murder) असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
दुचाकीला बांधून 400 मिटर फरफटत नेलं
आरोपींनी शिवाजीला आधी दुचाकीला बांधून (Tied to bike) चारशे मीटरपर्यंत फरफटत (pull
400 Meters) नेलं. त्यानंतर त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू
झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी (accus) शिवाजीचा मृतदेह एका पडक्या विहिरीत फेकून
दिला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच 29 जून रोजी चार अज्ञात तरुणांनी शिवाजीचे
अपरहण केलं होंत असाही दावा कुटुंबीयांनी केला आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत.
Web Title : gold price today mcx mumbai pune no change in gold and 1200 rs hike in silver price
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Covid-19 | उत्तर प्रदेशात मल्टीफ्लेक्स, जीम, स्टेडियम खुली तर कर्नाटकात मंदिरे उघडली