लातूर : बहुजननामा ऑनलाईन – उदगीर येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या बैठकीत उदगीर तालुका चर्मकार महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव गायकवाड हे होते. तर बैठकीस महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत उदगीर तालुक्यातील विविध विभाग आघाडीची कार्यकारिणीची निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली. त्यात तालुकाध्यक्षपदी मधुकर वाघमारे यांची तर सचिवपदी गोपाळ सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणीत मारुती भुजबळे (तालुका कार्याध्यक्ष), गंगाधर गिरगावकर (ता. उपाध्यक्ष), सुनील गायकवाड (शहराध्यक्ष), चंद्रकांत कल्याणकर (श. कार्याध्यक्ष), तानाजी लोकरे, (सचिव), नरसिंग सदानंदे (उपाध्यक्ष), पंढरी वाघमारे (जि. उपाध्यक्ष) यांची निवड करण्यात आली आहे.
युवक संघटनेमध्ये सुरेश झिल्ले (तालुकाध्यक्ष), शत्रुघ्न गायकवाड (सचिव) यांच्यासह माधव कांबळे, माणिक वाघमारे, गिरीधर वाघमारे, धनंजय लोकरे, अजय दामुवाले, शिवकुमार सोनवणे, संदीप वाघमारे, माधव वाघमारे यांचा समावेश आहे. शिक्षक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी सुधीर नाबदे यांच्यासह कार्यकारिणीत तुळशीदास वाघमारे, विश्वनाथ उद्बाळे, पांडुरंग वाघमारे, मधुकर सुरवसे हे आहेत. महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी उर्मिला वाघमारे, शहराध्यक्षपदी कल्पना भदाडे यांची निवड झाली आहे. या बैठकीस ईश्वर वाघमारे, गंगाधर दामवाले, बालाजी माने, संग्राम अमिलपुरे, माधव कल्याणकर, बालाजी माने, बजरंग भदाडे, बालाजी माने, लक्ष्मण कांबळे, देविदास गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. सुधीर नाबदे यांनी तर मधुकर वाघमारे यांनी आभार मानले.