बहुजननामा ऑनलाईन
कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये एक ॲप लॉन्च करण्यात आले आहे. या ॲपचे नाव कोविड अलर्ट न्यूयॉर्क ठेवले गेले आहे. या ॲपद्वारे खूप सहजतेने माहित होते की, तुम्ही कोरोना संक्रमित लोकांच्या संपर्कात आला आहात किंवा नाही.
न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांनी याची घोषणा केली. हे अॅप ॲपल स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरमध्ये मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशी माहिती एएनएनएसने सीएनबीसीला दिली. गुरुवारी एका संमेलनाला संबोधित करताना अँड्र्यू कुओमो म्हणाले की, आमच्याकडे 15,000 लोक आहेत ज्यांना ते संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले की नाही हे कळेल. त्यांनी सांगितले की, या अॅपद्वारे आपण संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला आहात हे आपणास कळेल.
यासह, ते म्हणाले की, हे ॲप ब्लूटूथचा वापर करून वापरला जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपले लोकेशन ट्रेस केले जाणार नाही. म्हणजेच कोणालाही घाबरून जाण्याची गरज नाही कारण या ॲपद्वारे आपली वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही. हे ॲप पूर्णपणे सुरक्षित असेल. हा फोन ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा उपयोग इतर फोनसह जवळचा अनुभव घेण्यासाठी करेल, परंतु भौगोलिक स्थितीचा शोधू घेऊ शकणार नाही.
या अॅपच्या घोषणेनंतर न्यू जर्सीचे गव्हर्नर फिल मर्फी यांनी कोविड अॅलर्ट एनजे अॅपचे अनावरण केले. यावेळी ते म्हणाले की, या संकटाच्या वेळी कोरोनाचा शोध लावण्यासाठी आम्ही ट्रेसिंग अॅपचा अवलंब करीत आहोत जेणेकरून संसर्ग रोखता येईल.