पुणे : बहुजननामा ऑनलाइन – जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळानं पहिलं आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी बँकॉक (थायलंड) येथे आयोजित केलेले आहे. संमेलनाचं स्वागताध्यक्षपद खासदार अमर साबळे हे भूषविणार असून या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलनासह इतर अनेक कार्यक्रम होणार आहे.
आयोजित केलेल्या या संमेलनात देश-विदेशातील साहित्यिक सहभागी होणार आहेत. तसेच यामध्ये विविध ग्रंथांचे प्रकाशनही केले जाणार आहे. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर, प्रा.दि.वा. बागूल, दयानंद सोनसळे, दिनेश वाघमारे, कैलास कणसे, गंगाधन बनबरे यांच्यासह इतर 20 मान्यवरांचा समावेश आहे.
Visit : bahujannama.com