बहुजननामा ऑनलाइन टीम –बॉलिवूड स्टार शाहरूख खान याच्या वाहनचालकाचं निधन झालं आहे. मोहन झिंगूजी डोंगरे असं त्यांचं नाव आहे. मूळचे ते अकोल्याचे रहिवाशी होते. किडनीच्या आजारानं डोंगरे यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
मोहन डोंगरे हे अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे गोरव्हा येथील रहिवाशी होते. 14 वर्षांचे असताना त्यांनी अकोला सोडून मुंबई गाठली होती. रोजगार शोधत त्यांनी मायानगरीतच मुक्काम ठोकला होता.
1989 मध्ये एका जाहिरातीच्या माध्यमातून मोहन डोंगरे यांची शाहरुख खानसोबत ओळख झाली. तेव्हा पासून ते शाहरुखच्या कुटुंबाकडे वाहनचालक म्हणून कामाला लागले होते. जवळपास 30 वर्षांपासून ते खान कुटुंबाचे सदस्य झाले होते.
2012 साली शाहरुखनं एक ट्विट केलं होतं. यात त्यानं डोंगरेंचा उल्लेख शुमाकर म्हणून केला होता. शाहरुख म्हणाला होता की, डोक्यावर सूर्य तळपतो आहे. रेडिओवर सेल्फ कंट्रोल आहे. माझा माणूस मोहन (शूमाकर) स्टेरींगवर आहे.”
Sun up in the sky…Self Control on the radio…my man Mohan (Schumacher) on the wheel… http://t.co/5LPd3grx
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 28, 2012
गेल्या 3 वर्षांपासून मोहन डोंगरे किडनीच्या आजारानं ग्रस्त होते. गेल्या काही दिवसात त्यांचा आजार बळावला होता. 25 ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खान कुटुंबानं त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्याला यश काही आलं नाही.