नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलर्सचा सर्वात वादग्रस्त आणि सर्वात प्रसिद्ध शो ‘बिग बॉस १४’ सुरु होण्यास तयार आहे. बातमीनुसार, शो पुढील महिन्यापासून प्रसारित केला जाईल. त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे आणि सलमान खानने तयारीही सुरू केली आहे. या शोबद्दल दररोज एक नवीन बातमी समोर येत आहे. कधी स्पर्धकांच्या नावाबाबत, तर कधी त्याच्या थीमबाबत.
अलीकडेच सलमान खानच्या फीबाबतच्या बातमीने सगळीकडे चर्चा होत आहे. हा शो सुरू होण्यापूर्वी सलमान खानच्या फीबाबत चर्चा होणे नवीन नाही. प्रत्येक वेळी नवीन सीझन येतो, तेव्हा सलमानच्या फीबाबत बरेच अंदाज लावले जात असतात. सलमान खान गेल्या १० सीझनपासून बिग बॉस होस्ट करत आहे. तो ‘वीकेंड का वॉर’मध्ये आठवड्यातून फक्त दोन दिवस येतो, पण त्या दोन दिवसांसाठी तो भरमसाठ फी घेतो. प्रत्येक सीजनमध्ये सलमानची फी वाढली आहे.
यावेळी त्याच्या फीची जी आकडेवारी समोर आली आहे, ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल. बिग बॉसबद्दल सर्वात अचूक माहिती देणारे ट्विटर अकाऊंट ‘द खबरी’ च्या म्हणण्यानुसार, सलमान यावेळी प्रत्येक एपिसोडसाठी २० कोटी रुपये घेत आहे. हा कार्यक्रम सुमारे तीन महिने चालतो. तर प्रत्येक भागासाठी २० कोटी रुपये तीन महिन्यांसाठी जोडल्यास सलमानची तीन महिन्यांची फी ४५० कोटी रुपये असेल. म्हणजेच बिग बॉस १४ साठी सलमान ४५० कोटी रुपये घेणार. आतापर्यंतच्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस १४’ ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते.
https://twitter.com/TheRealKhabri/status/1301381496779882496