Ajit Pawar | पुणेकरांना दिलासा तर पिंपरी चिंचवडकरांची निराशा, सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल

ajit-pawar-ncp-ajit-pawar-said-about-pune-and-pimpri-chinchwad-corona-unlock-guidelines

पुणे : बहुजननामा ऑनलाईन पुण्यात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये मॉल (mall) उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, आता पुण्यातील मॉल सोमवार (दि.14) पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिसाला मिळाला आहे.

पुणे शहरातील पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांच्या आत आला आहे. त्यामुळे सोमवार पासून कोरोना निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. परंतु पिंपरी चिंचवडसाठी निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. कारण त्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या वर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अजित पवार यांच्या घोषणेनंतर पुणेकरांसाठी दिलासा मिळाला आहे, तर पिंपरी-चिंचवडकरांची निराशा झाली आहे.
अजित पवार यांनी पुढे सांगितले की, पुण्यात सोमवार पासून मॉल उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील दुकाने रात्री 7 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच रेस्टॉरंट, हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास सोमवारपासून परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच चित्रपट गृहे, नाट्यगृहे बंदच राहणार असून नवीन नियम सोमवारपासून लागू होणार आहेत.

मानाच्या पालख्यांना 20 बसेस
देहु (Dehu) आणि आळंदी (Aalandi) पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच 10 मानाच्या पालख्यांसाठी 50 जणांना सहभागी होता येणार आहे. त्यांना मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला आहे. पालखीसोबत त्यांना चालत जाता येणार नाही. प्रत्येक पालखीला 2 बसेस असे 10 पालख्यांना 20 बसेस दिल्या जातील. अजित पवार पुढे म्हणाले, मानाच्या पालखी सोहळ्याचं आगमन हे दशमीला पंढरपूरात होईल. वाखरीत विशेष वाहनाने पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरपर्यंत पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंदीर दर्शन खुले करण्यात येणार नाही, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

कृपया हे देखील वाचा:
CoWIN पोर्टल पूर्णपणे सुरक्षित, केंद्राने म्हटले – ‘हॅक झाला नाही 15 कोटी भारतीयांचा डेटा’

1 वर्षात 60% पर्यंत रिटर्न देईल ही स्कीम, तुम्ही सुद्धा लावू शकता येथे पैसे; जाणून घ्या कसे?

चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून मॉल उघडण्यास परवानगी तर दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली – अजित पवारांनी दिली माहिती