नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गाची तिसरी लाट पाहता सरकारने कोरोना व्हॅक्सीन प्रोग्राममध्ये वेग आणण्याचा प्रयत्न करत आहे, तर काही लोक सरकारचे हे मिशन कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतेच वृत्त आले आहे की, भारताचे व्हॅक्सीन रजिस्ट्रेशन पोर्टल (CoWIN) कोविन (CoWIN) कुणीतरी हॅक केले आहे. तसेच म्हटले आहे की, पोर्टलवरून 15 कोटी भारतीयांचा डेटा सुद्धा चोरी करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सरकारने अशा प्रकारचे कोणतेही वृत्त फेटाळले आहे म्हटले की, ’कोविन’ पोर्टल पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कोणत्याही भारतीयाचा डेटा चोरी झालेला नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे की, असे अनेक रिपोर्ट समोर आले आहेत की कोविन प्लॅटफॉर्म हॅक झाला आहे. आमच्या टीमला तपासात हे वृत्त बनावट असल्याचे आढळले आहे. पोर्टलवरील सर्व माहिती सुरक्षित आहे. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य पाहता याचा तपास कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (ईजीव्हीएसी) कडून केला जात आहे.
ईजीव्हीएसीचे अध्यक्ष डॉक्टर आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, सोशल मीडियावर भारताचे व्हॅक्सीन नोंदणी पोर्टल ’कोविन’ हॅक झाल्याचे वृत्त वायरल होत आहे. आम्ही सर्वांना सांगतो की, कोविनवरील सर्व डेटा सुरक्षित आहे. कोविनवरील माहिती कुणाशीही शेयर केलेली नाही.
कृपया हे देखील वाचा:
1 वर्षात 60% पर्यंत रिटर्न देईल ही स्कीम, तुम्ही सुद्धा लावू शकता येथे पैसे; जाणून घ्या कसे?
चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्रीचे वाटप