पुणे : बहुजननामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday) गरीब गरजूंना पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात आले. नगरसेविका ज्योती गणेश कळमकर (Corporator Jyoti Kalmakar) व भाजप (BJP) उपाध्यक्ष गणेश कळमकर (Ganesh Kalmakar) यांच्या वतीने प्रभागातील 200 जणांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रीचे (Umbrella) वाटप करण्यात आले. प्रभागातील 2500 जणांना छत्रीचे वाटप करण्यात येणार असून आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्राथमिक स्वरुपात छत्रीचे वाटप करण्यात आले.
https://fb.watch/62PO2EKyq6/
यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सरचिटणीस तथा नगरसेविक दिपक पोटे, सरचिटणीस गणेश घोष, भाजप प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस, नगरसेवक सुशील मेंगडे, उपाध्यक्ष धनंजय जाधव, चिटणीस चंद्रकांत पोटे, प्रशांत हरसुले, प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, राहुल पारखे, सागर ताम्हाणे, बाळकृष्ण कळमकर, लखन कळमकर, संदीप कळमकर, प्रशांत कळमकर, भरत कळमकर, सुरेश कळमकर, अनिल कळमकर, गणेश चाकणकर आदी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ, हार न आणता सर्वसामान्यांना मदत करावी अशी विनंती केली होती. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. माझ्या वाढदिवसाला सर्वसामान्यांना गजर असलेली छत्री वाटप करुन मदत केली त्याबद्दल सर्वांचे आभार, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.