बहुजननामा ऑनलाइन टीम –दूरसंचार कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन्स एक निश्चित डेटा मर्यादेसह येतात. प्रीपेड प्लॅन्समध्ये एकतर एफयूपी (FUP) सह दररोज डेटा ऑफर केला जातो किंवा काही प्लॅन्स विना FUP फिक्स अमाऊंट डेटासह येतात. डेटाची लिमिट संपल्यानंतर ग्राहक अतिरिक्त डेटासाठी 4G डेटा व्हाउचर खरेदी करू शकतात. आम्ही येथे तुम्हाला Jio, Airtel, BSNL आणि Vi मधील सर्वात स्वस्त 4G डेटा व्हाउचर्सबद्दल सांगणार आहोत.
एअरटेल (Airtel)
कंपनीचा सर्वात स्वस्त 4G डेटा 48 रुपयांपर्यंत येतो. या व्हाउचरमध्ये ग्राहकांना 3GB डेटा देण्यात आला आहे. हे व्हाउचर 28 दिवसांच्या वैधतेसह येते. त्यासह मिळणारा डेटा व्हाउचरच्या एक्सपायरी डेट नंतर एक्सपायर होतो.
व्होडाफोन आयडिया (Vi)
कंपनीचा सर्वात स्वस्त 4G डेटा 16 रुपयांपर्यंत येतो. हे व्हाउचर ग्राहकांना 1GB डेटा देते. हे व्हाउचर केवळ 24 तासांच्या वैधतेसह येते. तसेच या प्लॅनमध्ये इतर काही फायदे देण्यात येत नाहीत.
बीएसएनएल (BSNL)
Vi प्रमाणे सरकारी टेलिकॉम कंपनीही सर्वात स्वस्त 4G डेटा व्हाउचर 16 रुपयांमध्ये ऑफर करते. मात्र, त्यात ग्राहकांना 2GB डेटा देण्यात आला आहे. हा प्लॅन देखील 24 तासांच्या वैधतेसह येतो.
जिओ (Jio)
रिलायन्स जिओचे सर्वात स्वस्त 4G डेटा व्हाउचर 11 रुपयांपर्यंत येते. इतर तिन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत हा प्लॅन सर्वात स्वस्त आहे. कंपनीच्या 11 रुपयांच्या 4G डेटा व्हाउचरमध्ये ग्राहकांना 1GB डेटा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्लॅन कोणत्याही वैधतेशिवाय येतो. म्हणजेच, त्याची वैधता आपल्या बेस प्लॅन इतकी असते.