बहुजननामा ऑनलाईन टीम – टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. कंपनीने आपल्या 65 रुपयांच्या प्रीपेड योजनेत डबल डेटा ऑफर जाहीर केला आहे. स्मार्ट रीचार्ज म्हणून एअरटेलने ही योजना सुरू केली. पूर्वी 65 रुपयांच्या रिचार्ज मध्ये ग्राहकांना फक्त 65 रुपयांचा टॉकटाइम मिळायचा, तर आता ग्राहकांना 65 रुपयांच्या रिचार्जवर डबल टॉकटाइम देण्यात येणार आहे.
म्हणजेच आता 65 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना 130 रुपयांचा टॉकटाईम दिला जात आहे. या योजनेची वैधता 28 दिवसांची आहे. याव्यतिरिक्त, या योजनेत इंटरनेट डेटा देखील देण्यात येत आहे. या योजनेत ग्राहकांना 200MB 4G / 3G / 2G डेटा दिला जाणार आहे.
एका वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सध्या एअरटेलने देशातील काही भागातच ही सुधारित योजना उपलब्ध करुन दिली आहे. यात झारखंड, गुजरात, आसाम, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर पूर्व, ओडिशा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, पूर्व-पश्चिम यूपी, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.
599 रुपयांच्या योजनेत जीवन विमा उपलब्ध
यापूर्वी एअरटेलने 599 रुपयांच्या प्रीपेड पॅकमध्ये ४ लाखांपर्यंतचे जीवन विमा संरक्षण जाहीर केले होते. एअरटेलने Bharti AXA Life Insurance बरोबर भागीदारी केली आहे. कंपनीने आपल्या प्रीपेडवर 4 लाखा पर्यंत विमा देण्याची घोषणा केली आहे. हि विमा लाइफ कव्हर टर्म इन्शुरन्ससारखे असेल, ज्यामध्ये मृत्यूनंतर नॉमिनीला पैसे मिळतील.
Visit : bahujannama.com