अहमदनगर न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Ahmednagar News | लोक प्रतिनिधीने छळ केल्याचा आरोप करत आत्महत्येचा इशारा देणार्या पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या सोशल मीडियावरील वायरल ऑडिओ क्लिपमुळे सर्वत्र खळबळ उडाली (Ahmednagar News) आहे. ही क्लिप पारनेर तहसीलदार ज्योती देवरे (parner tahsildar jyoti deore) यांचीच असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (dr rajendra bhosale collector) यांनी म्हटले आहे. देवरे यांनी याबाबत आठ दिवसांपूर्वी तक्रार केली असून त्याची महिला आयोगामार्फत चौकशी सुरू आहे. क्लिपवर काय भूमिका घ्याचची हे प्रशासनाने अद्याप ठरवलेले नसल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोशल मीडियावर वायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये देवरे यांनी आमदार निलेश लंके (mla nilesh lanke) यांच्या अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत.
विधिमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मारहाण केल्याची तक्रार वाहन चालकाकडून जबरदस्तीने लिहून घेणे, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तक्रार दाखल करण्याची धमकी देणे,
असे प्रकार आपल्यासोबत घडल्याचे त्यांनी म्हटले असून कथन करताना त्या रडत आहेत.
दिपाली देवरे यांनी आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून निवेदन केले असून यात म्हटले आहे की, मी लवकरच तुझ्यासोबत येत असल्याचे सांगत, महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठीशी घालतात, याबाबत त्यांनी या क्लिपमध्ये आरोप केले आहेत.
आमदार निलेश लंके यांनी दिली प्रतिक्रिया
तहसीलदारांच्या कारभाराबाबत अरुण आधळे हे उपोषणाला बसले होते.
त्यानंतर प्रशासनाने केलेल्या चौकशीत देवरे यांच्या कामात अनेक त्रुटी आढळल्या.
हा हवाल मंत्रालयात गेल्याने आपल्यावर कारवाई होऊ शकते, या भीतीमुळे तहसीलदार देवरे यांनी ऑडिओ क्लिप बनवून बचावाचा प्रयत्न केला आहे.
अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.
Web Title : ahmadnagar news | parners female tehsildar warns suicide clip goes viral social media mla says his attempt save
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update