बहुजननामा ऑनलाइन टीम – प्रसिद्ध पोर्न वेबसाइट पोर्नहबने (famous porn website)आपल्या साइटवरून लाखो व्हिडिओ काढून टाकले आहेत. साइटवर व्हेरीफाइट नसलेल्या वापरकर्त्यांचे व्हिडिओ काढले गेले आहेत. एका अहवालानुसार, सोमवारी, कॅनडाच्या या अॅडल्ट साइटवरील व्हिडिओंची संख्या 130 लाखांवरून 40 लाखांवर आली आहे. साइटवरून अल्पवयीन आणि लैंगिक तस्करी करणार्या मुलींचा व्हिडिओ काढण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप पोर्नहबवर होत आहे. यापूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की मोठ्या संख्येने आक्षेपार्ह, बेकायदेशीर व्हिडिओ साइटवर आहेत. यानंतर व्हिसा आणि मास्टरकार्ड या दोन मोठ्या क्रेडिट कार्ड कंपन्यांनी पोर्नहबच्या पेमेंटवर प्रोसेस करणार नसल्याचे जाहीर केले. आता वापरकर्ते पोर्नहबवर व्हेरिफिकेशन केल्याशिवाय सामग्री अपलोड करण्यात सक्षम होणार नाहीत.
कंपनीने निवेदनात म्हटले की, साइटच्या सर्व कन्टेंटसाठी व्हेरिफिकेशनची अट लागू केली गेली आहे, परंतु फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, यूट्यूब सारख्या इतर प्लॅटफॉर्मवर अद्यापपर्यंत असे धोरण लागू केलेले नाही. वृत्तानुसार, पोर्नहबच्या निर्णयामुळे महामारीमुळे आधीच संकटात सापडलेल्या लक्षावधी लैंगिक कामगार आणि मॉडेल्सच्या रोजीरोटीस धोका निर्माण होऊ शकतो. आतापर्यंत, कोणताही वापरकर्ता या वेबसाइटवर सामग्री अपलोड करू शकतो. पोर्नहबने असेही म्हटले आहे की, वेबसाइटच्या धोरणांमुळे त्यांना लक्ष्य केले जात नाही तर ते अॅॅॅडल्ट कन्टेंट व्यासपीठ आहे. या अहवालानुसार, फेसबुकनेच म्हटले आहे की गेल्या तीन वर्षांत मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित 8 कोटी 40 लाख कन्टेंट त्यांच्या व्यासपीठावर आढळला, तर इंटरनेट वॉच फाउंडेशनने म्हटले आहे की, याच काळात पॉर्नहबवर केवळ 118 असे कन्टेंट आढळले.