गांधीनगर : वृत्तसंस्था- गुजरातच्या पालनपूरमध्ये एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न करत चौथ्या मजल्यावरून उडी मारली आहे. पोलिसांनी त्याला जमिनीवर आदळण्यापासून वाचवले आहे. त्यामुळे तो वाचला आहे. यानंतर त्याला त्याच्या घरच्यांच्या सुपूर्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरापासून दूर वासणा गावचा रहिवासी राहुल वाल्मिकीच्या होणाऱ्या पत्नीने लग्नासाठी नकार दिला. यानंतर दु:खी होता तो डॉक्टर्स हाऊस भागातील चार मजली इमारतीवर चढला. लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांने कोणाचेही ऐकले नाही. त्या तरुणाचा राग अनावर झाला होता. तो कोणाचंही काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्याला नाकारल्याचे दु:ख त्याला सहन होत नव्हते.
यानंतर तेथे उपस्थित लोकांनी पोलिसांना पाचरण केले. पोलीस फायर ब्रिगेड सोबत तिथे पोहोचले. पोलिसांनी समजावल्यानंतरही तो तरुण ऐकेना. त्याने ब्लिडींगच्या छतावरून उडी मारली. परंतु तोपर्यंत लोकांनी आणि पोलिसांनी मिळून एक मोठी जाळी पसरवली. तो थेट जाळीवरच पडला. त्याला जास्त इजा पोहोचली नाही. नंतर त्याला त्याच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशलवर व्हायरल होत आहे.