बहुजननामा ऑनलाईन : भारत हा सर्व धर्माना समानतेची वागणूक देणारा देश आहे. असंख्य जाती आणि धर्माचे लोक इथे एकत्र नांदतात. अशीच समानतेची शिकवण देणार उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकातील हुबळी हे ठिकाण. कारण हुबळी या ठिकाणी एकाच छताखाली गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र साजरी केली जाते.
‘आम्हाला धर्म आणि जात समानतेची शिकवण लोकांनपुढे मांडायची आहे. सलोख्याची उत्तम शिकवण द्यायची आहे. जे या वेळी खूप गरजेचे आहे.’ असे येथील स्थानिक मोहम्मद शाम यांचे म्हणणे आहे. तसेच दुसऱ्या स्थानिकाने सांगितले कि, ‘तब्बल ४००० लोकसंख्या असणाऱ्या या गावात आम्ही सर्व जण समरसपणे राहतो. इथे सर्वजण एकत्र काम करतात.’
या गावात हिंदू आणि मुस्लिम दोघेही एकत्र जमतात आणि गणेशोस्तव, मोहरम एकत्र साजरी करतात. दोन्ही समुदाय एकाच छताखाली प्रार्थना करतात. त्यामुळे हुबळी हे जातीय सलोख्याचे एक उत्तम उदाहरण आहे.
Karnataka: Hubli locals celebrate Ganesh Chaturthi, observe Muharram under one roof
Read @ANI Story| https://t.co/NEhzzgV5nx pic.twitter.com/Ne4xwGUEMl
— ANI Digital (@ani_digital) September 10, 2019