नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीर प्रकरणी जगात पाकिस्तान वेगळा पडला आहे. आता अफगणिस्ताननेही बेजबाबदार वक्तव्य केल्याबद्दल पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला आहे. नुकतेच पाकिस्तानने म्हटले होते की, काश्मीरमधील सद्यस्थितीचा परिणाम अफगणिस्तानात शांततेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांवर होईल. परंतु याला आता अमेरिकेतील अफगणिस्तानच्या दूतावासाने उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “काश्मीरमधील परिस्थितीशी अफगणिस्तानात सुरु असलेल्या शांतता बंदोबस्तासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांशी जोडणे हे दुस्साहसी, अन्यायकारक आणि बेजबाबदार आहे.”
‘बेजबाबदार वक्तव्य’
अमेरिकेत अफगणिस्तानच्या राजदूत रोया रहमानी यांनी म्हटले की, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगणिस्तान अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत असद मजीद खान यांच्या त्या दाव्याचे खंडन करत आहे की, काश्मीरमध्ये सुरु असलेल्या तणावाचा परिणाम अफगणिस्तानमधील शांती प्रक्रियेवर होईल.” त्यांनी असेही म्हटले की, “असं कोणतंही वक्तव्य जे काश्मीरमधील परिस्थितीला अफगणिस्तानातील शांती प्रयत्नांशी जोडेल जे दुस्साहसी, अन्यायकारक आणि बेजबाबदार आहे.”
‘पाकिस्तानला अफगणिस्तानात हिंसा भडकवायची आहे’
काश्मीरला भारत आणि पाकिस्तानातील द्विपक्षीय प्रकरण सांगत रहमानी यांनी म्हटले की, “त्या देशाचं म्हणणं आहे की, काश्मीर मुद्द्याला अफगणिस्तानसोबत जाणून बुजून जोडण्याचा पाकिस्तानचा हेतू अफगणिस्तानातील हिंसेला अजून वाढवणं आहे.” रहमानी यांनी म्हटलं की, “त्यांच्या पाकिस्तानी समक्षकांचे वक्तव्य त्या सकारात्मक आणि रचानात्मक बैठकीतील संवादाच्या एकदम उलट आहे जे अफगणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या नुकत्याच झालेल्या प्रवासादरम्यान त्यांच्यात आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकस्तानचे सेनाप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यात झालं होतं.