Aditya Thackeray – Aarey Protest | राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची मुंबई पोलिसांना नोटीस ! आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा

Aditya Thackeray - Aarey Protest | NCPCR seeks FIR against Aaditya for using children in 'Save Aarey' protest

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Aditya Thackeray – Aarey Protest | कांजूरमार्ग येथे होणारे मेट्रो कारशेड (Kanjurmarg Metro Car Shed) पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) सत्तेत येताच घेतला. केवळ राजकीय द्वेषातून घेतलेल्या या निर्णयाविरोधात पर्यावरण प्रेमी संतप्त झाले आहेत. यासाठी ‘आरे वाचवा’ आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. (Aditya Thackeray – Aarey Protest)

 

आरे येथे सध्या दर रविवारी आंदोलन करण्यात येत आहे. रविवारी झालेल्या या आंदोलनाला आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते. या आंदोलनात काही लहान मुलेसुद्धा सहभागी झाली होती, त्यांचा आदित्य यांच्यासोबतचा फोटो प्रसिद्ध झाल्याने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने (Rashtriya Bal Hakka Sanrakshan Ayog) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) नोटीस बजावली आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. (NCPCR Notice To Mumbai Police)

 

 

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलिसांना बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले की, मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवा सेनेमधील अल्पवयीन मुलांचा वापर ‘आरे वाचवा’ आंदोलनासाठी केला आहे. (Aditya Thackeray – Aarey Protest)

याबाबतच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहे. संबंधितांनी हातात पोस्टर घेऊन आंदोलन करणार्‍या अल्पवयीन मुलांचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्यामुळे संबंधित आरोपीविरोधात तत्काळ FIR दाखल करून चौकशी करण्याची विनंती, आयोगाकडून केली जात आहे. हे पत्र मिळाल्यानंतर तीन दिवसात कारवाई करून संबंधित अहवाल आयोगाकडे National Commission for Protection of Child Rights (NCPCR) पाठवावा, असे आयोगाने म्हटले आहे.

 

आरे तील आंदोलनात बोलताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील नवीन सरकारवर टीका केली होती.
त्यांनी म्हटले होते की, आमचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या विकासासाठी (Mumbai Development Project) हे सर्व प्रकल्प आहेत.
कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी योग्य आहे. येथे एकाच ठिकाणी चार कारशेड निर्माण करता येतील. त्यामुळे 10 हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

 

Web Title :- Aditya Thackeray – Aarey Protest | NCPCR seeks FIR against Aaditya for using children in ‘Save Aarey’ protest

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray – Shivsena MP Sanjay Raut | उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर संजय राऊत नाराज ?; चर्चांना उधाण

 

Dengue Patients-Pune Corona | शहरात कोरोनासोबतच डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ ! डेंग्यु रोखण्यसाठी नागरिकांनी स्वत:च्या घरापासून काळजी घ्यावी; महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन

 

Pune ACB Trap On PMC Officers | 40 हजाराच्या लाच प्रकरणी पुणे मनपाच्या उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक