बहुजननामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार श्रद्धा कपूर (Actress Shraddha Kapoor) आता लवकरच नागिनीच्या रूपात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तिच्या आगामी सिनेमामध्ये श्रद्धा(Actress Shraddha Kapoor) नागिनीचा रोल साकारताना दिसणार आहे. श्रद्धानं तिच्या नागिनीच्या लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.
श्रद्धानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटो ती नागिनीच्या लुकमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं सांगितलं आहे. हे पोस्टर्स तिच्या चाहत्यांकडून तयार केले गेलेले आहेत. तिला खूप आवडले आहेत, असंही ती म्हणाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, श्रद्धा नागिनीची भूमिका साकारणार आहे. आता तिनं नव्या लुकमधील फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सध्या तिचे हे फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
श्रद्धाच्या आगामी सिनेमाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. परंतु डायरेक्टर विशाल फुरिया हा सिनेमा डायरेक्ट करणार आहे अशी माहिती आहे. निखिल द्विवेदी सिनेमाची निर्मिती करणार आहे. हा आगामी प्रोजेक्ट 3 सिनेमांची सीरिज असेल.
श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती इच्छाधारी नागीन साकारताना दिसणार आहे. ती काही दिवसांपूर्वीच स्त्री, स्ट्रीट डान्सर 3 डी या सिनेमात वरुण धवनसोबत आणि बागी 3 सिनेमात टायगर श्रॉफसोबत अशा काही सिनेमात काम करताना दिसली आहे.