मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये सतत लोकांची मदत करणारा अभिनेता सोनू सूद अजूनही चर्चेत आहे. या सकंटकाळात अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांची तो सतत मदत करताना दिसत आहे. सोनू आता परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशात परत आणणार आहे. खुद्द सोनूनंच यासंदर्भात घोषणा केली आहे. यासाठी पहिली फ्लाईट 22 जुलै रोजी पाठवण्याची तयारी सुरू आहे.
किर्गीस्तानातून विद्यार्थ्यांना घरी आणण्याची तयारी
सोनूनं ट्विट करत लिहिलं की, किर्गीस्तानात अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी परत आणण्याची वेळ आली आहे. पहिली चार्टर्ड फ्लाईट 22 जुलै रोजी जाईल. याचे डिटेल मेल आयडी आणि मोबाईलवर पाठवले जातील. याच आठवड्यातून आणखी काही देशांमधून चार्टर्ड प्लाईटची सोय केली जाईल.”
This is to inform to all the students of Kyrgyzstan that it’s time to come home ❣️we are operating the first charter Bishkek -Varanasi on 22nd July.The details of which will be sent to your email id and mobile phones in a while. Charters for other states will also fly this week.
— sonu sood (@SonuSood) July 21, 2020
लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोचवल्यानं सोनू सूद सतत चर्चेत होता. इतकंच नाही तर त्यानं डॉक्टर्स आणि स्टाफसाठीही खूप मदत केली आहे. सोनूनं केलेली मदत अजूनही सुरू आहे. सोनू सूदनं नुकतीच महाराष्ट्र पोलिसांना 25000 फेस शिल्डची मदत केली होती. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोनूसोबतचा एक फोटो शेअर करत यांसर्दभात माहिती होती. अनिल देशमुख यांनी सोनूच्या या मदतीबद्दल त्याचे आभारही मानले होते.