पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई-पुणे एक्सप्रेस( Mumbai-Pune Express) वेवर अपघाताचे सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात जीएसटी उपायुक्तांचा मृत्यू झाला होता. आज मुंबई-पुणे एक्सप्रेस एक्सप्रेस( Mumbai-Pune Express) वेवर मर्सिडीज कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर चालक तासभर गाडीत अडकला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर किवळे एक्झिट जवळ हा अपघात झाला आहे. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या शेजारी सुरक्षा कठड्याला धडकली. या अपघातात कार चालक गंभर जखमी झाला आहे. अपघातानंतर कार चालक तासभर गाडीत अडकला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर देवदूत यंत्रणा आणि आयाआरबी, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गाडीमध्ये अडकलेल्या वाहन चालकाला कारमधून बाहेर काढले. त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपातानंतर चालक तासभर गाडीत अडकून पडला होता.