ACB Trap News | बीडीओंची सही पाहिजे तर ब्लॅक डॉगचे दोन खंबे द्या, दोन लाचखोर ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap News If you want the signature of BDO’s, give two bottle of black dog, two bribe-taking village servants arrested by ACB

जालना : बहुजननामा ऑनलाइन – बांधकामाच्या एमबीवर व निधी अदा करण्याच्या परवानगी लेटरवर बीडीओंची (BDO) सही हवी असेल तर सात हजार रूपये किंवा दारूचे दोन खंबे देण्याची मागणी (Demanding a Bribe) करणाऱ्या आणि लाचेस प्रोत्साहन देणाऱ्या दोन ग्रामसेवकांविरूद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. जालना एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) या प्रकरणात सोमवारी (दि.10) बदनापूर पोलिस ठाण्यात (Badnapur Police Station) गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थ कृष्णा घोडके Siddhartha Krishna Ghodke (वय- 42), उज्जैनपुरी येथील महिला ग्रामसेविका अंबुलगे (Ujjainpuri Women Gramsevaka Ambulge) असे अटक करण्यात आलेल्या दोन ग्रामसेवकांची नावे आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत 35 वर्षाच्या व्यक्तीने जालना एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील भूमीगत नाली बांधकामाचे एमबीवर व बांधकाम पूर्ण झाल्याने उर्वरित 1 लाख 48 हजार 467 रूपये मजुरांना व साहित्य देणाऱ्या दुकानदारांना निधी अदा करण्याच्या परवानगी पत्रावर गटविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी लागते. ती स्वाक्षरी आणून देण्यासाठी तक्रारदाराकडे बदनापूर पंचायत समितीतील (Badnapur Panchayat Samiti) ग्रामसेवक सिद्धार्थ घोडके हे 7 हजार रूपये किंवा ब्लॅक डॉगचे दोन खांबे (Black Dog Bottle) मागत असल्याची तक्रार तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Jalna ACB Trap) तक्रार केली.

जालना एसीबीच्या पथकाने 20 जून रोजी पडताळणी केली. त्यावेळी ग्रामसेवक सिध्दार्थ घोडके यांनी पंचासमक्ष तुमचे काम केले आहे. सात हजार रूपये लगेच द्यावे लागतील. नाही तर दोन ब्लॅक डॉगचे खांबे द्यावे लागतील, अशी मागणी केली. तर अंबुलगे यांनी एक लाखाला बीडीओ यांना 4 हजार रूपये, विस्ताराधिकाऱ्यांना दीड ते दोन हजार रूपये, क्लार्क यांना 500 रूपये द्यावे लागतील, असे सांगत तक्रारदारास लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे समोर आले. या प्रकरणात लाच मागणारे ग्रामसेवक सिद्धार्थ घोडके, प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामसेविका अंबुलगे यांच्याविरूद्ध सोमवारी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे (DySP Kiran Bidve),
पोलीस अंमलदार शिवाजी जमधडे, गजानन घायवट, कृष्णा देठे, गणेश बुजाडे यांच्या पथकाने केली.

Web Title : ACB Trap News If you want the signature of BDO’s, give two bottle of black dog, two bribe-taking
village servants arrested by ACB