Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; पुणे पोलिसांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील एकाला महाड येथून अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal | नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आल्याचे समजते. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे म्हटले. दरम्यान, धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि कोरेगाव पार्क पोलिसांनी (Pune Police) कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील एकाला महाड (जि. रायगड) येथून अटक (Arrested) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी की. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सोमवारी पुण्यात (Pune News) असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव प्रशांत पाटील Prashant Patil असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तत्काळ या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत दशरथ पाटील Prashant Dashrath Patil (24, रा . चंदगड, कोल्हापूर) या व्यक्तीला रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक केले. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, झोन 2 च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक आयुक्त सुनील तांबे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणि कोरेगाव पार्क पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
या पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ (Increased Security) करण्यात आली आहे.
Web Title : Chhagan Bhujbal | death threat to ncp cabinet minister chhagan bhujbal accused arrested by pune police crime branch
- DRDO Scientist Pradeep Kurulkar | डॉ. प्रदीप कुरुलकरांनी दोन महिलांवर केले अत्याचार; ATS च्या दोषारोपपत्रातून पुन्हा धक्कादायक माहिती समोर
- Health Tips | बाथरूममधील 5 वस्तू आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक, काळजी घेणे अतिशय गरजेचे, जाणून घ्या दुष्परिणाम
- Low Blood Pressure | पाण्यात 2 दोन सफेद वस्तू मिसळून करा सेवन, लो ब्लड प्रेशरमध्ये ताबडतोब मिळेल आराम, शरीर राहील हायड्रेटेड
Comments are closed.