बहुजननामा ऑनलाईन
इंदापूर शहरातील पूणे सोलापूर जुण्या हायवे रोडवर बाबाचौक येथे दुधाच्या टँकरने स्कुटी गाडीला पाठीमागुन धडक दील्याने स्कुटीवरील बालकाचे डोक्यावरून टँकरचे पुढील चाक गेल्याने अडीच वर्षीय बालकाचा मृृृत्यु झाला आहे तर स्कुटीवरील आणखी दोघेजण जखमी झाल्याची घटना रवीवारी दुपारी १:१५ वा.चे सुमारास इंदापूरात घडली आहे.
याबाबत मारूती वामन खंडागळे (वय ३२) पोलीस पाटील, मुळ रा. गणेशवाडी,बावडा नरसिंगपुर रोड, व सध्या रा.४० फुटी रोड, नेताजीनगर इंदापूर जि.पूणे यांनी याबाबतची फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दीली असुन पोलीसांनी टँकरसह चालकास ताब्यात घेतले असुन त्याचेवर बेजबाबदारपणे वाहन चालवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
रविवार दिनांक ११ आक्टोंबर रोजी दुपारी १:१५ वाचे समारास फिर्यादीचा भाचा गौरव राजेंद्र मिसाळ व बहीण अश्वीनी आणी अडीच वर्षीय भाचा आदित्य हे त्यांचे मालकीचे टीव्हीएस ज्युपीटर स्कुटी नं. एम.एच.४२, ए.झेड.२५५८ या मोटारसायकल वरून दवाखाण्यातुन घराकडे जात असताना बाबा चौकातील राज कोल्ड्रिंक्स व सोडा शाॅपी दुकानासमोरून बस स्टँडकडे जात असताना पूणे बाजुकडुन सोलापूर बाजुकडे जाणारा टाटा कंपनीचा १६१३ टरबो माॅडेलचा नेचर डेअरीचा दुधाचा टँकर नं. एम.एच.१०, झेड. १३५९ हा भरधाव वेगात पाठीमागुन येवुन स्कुटी गाडीला जोराची धडक दीली व अपघात केला.
अपघात घडल्यानंतर टँकर चालकाने पळुन जाण्याच्या उद्देशाने अपघातग्रस्त स्कुटी ५० फुटापर्यंत फरफत नेल्याने स्कुटीवरील अडीच वर्षीय बाळाच्या डोक्यावरून टँकरचे पुढील चाक गेल्याने बाळाचा मृत्यु झाला. तर स्कुटीचालक फीर्यादीचा भाचा गौरव व बहीण अश्वीनी हे दोघे जखमी झाले असुन त्यांचेवर इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय येथे उपचार सुरु आहेत.तर पोलीसांनी टँकरसह चालकास ताब्यात घेतले असुन बेजबाबदारपणे वाहन चालवुन अडीच वर्षीय बालकाच्या मृृृत्युस कारणीभुत ठरल्याच्या कारणावरून त्याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस नरिक्षक अजीत जाधव हे करत आहेत.