बहुजननामा ऑनलाईन – घरफोड्याचा धुमाकूळ कमी होत नसताना कर्वेनगर भागात उघड्या दरवाजा वाटे आत प्रवेशकरून पावणे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
याप्रकरणी शुभांगी आसबे (वय 45) यांनी आलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या येथील नवसह्याद्री सोसायटीत राहण्यास आहेत. दरम्यान त्यांनी बेडरूमच्या कपाटात सोन्याचे दागिने ठेवले होते. 22 फेब्रुवारीला हे दागिने होते. मात्र काल त्यांनी ते पाहिले असता नसल्याचे दिसून आले. यामुळे त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले आहे. घराचे दार उघडे असताना या कालावधीत अज्ञाताने त्यांच्या बेडरूममध्ये घुसून कपाटात ठेवलेले पावणे तीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक धीरज गुप्ता हे करत आहेत.