बहुजननामा ऑनलाइन टीम – सनरायझर्स हैदराबादचा राशिद खान आयपीएल 13 मध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. संघाच्या अनेक विजयांमध्ये राशिदच्या फरकीचा मोलाचा वाटा आहे. मात्र गुगलवर(Google Search) राशिदची पत्नी कोण हे शोधायला गेलं तर गुगलकडून(Google Search) अभिनेत्री अनुष्का शर्मा असं उत्तर मिळत आहे. इतकंच नाही तर अनुष्काचा फोटोही दाखवला जात आहे.
अनुष्का शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याची पत्नी आहे. परंतु राशिदची पत्नी कोण आहे असं सर्च केल्यावर अनुष्काचं नाव आणि फोटो का येतो हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.
गुगल सर्च अनुष्का शर्माला म्हणतंय राशिद खानची बायको@AnushkaSharma @imVkohli @rashidkhan_19 pic.twitter.com/HC499G5MfE
— TimePass (@TimePassTalks) October 12, 2020
राशिद खानची पत्नी सर्च केल्यावर अनुष्का शर्माचं नाव का येतं ?
2018 मध्ये राशिदनं इंस्टाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला होता. त्यावेळी त्याला बॉलिवूडमधील आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यानं अनुष्का शर्मा आणि प्रीती झिंटा असं उत्तर दिलं. त्यावेळी अनेकांनी असं वृत्त दिलं होतं की, राशिदची आवडती अभिनेत्री अनुष्का शर्मा आहे. अनेकांनी सोशलवर देखील मेंशन केलं. याच कनेक्शनमुळं गुगलवर राशिद खानची पत्नी सर्च केल्यानंतर अनुष्का शर्माचं नाव येत आहे.
कोण आहे राशिद खान ?
राशिद खान अफगाणिस्तानचा क्रिकेटर आहे. 1998 साली जन्मलेला राशिद अफगाणिस्तानच्या संघाचा उपकर्णधार आहे. अफगाणिस्तानचा संघ जून 2018 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात राशिद खान खेळला होता. त्यानंतर वर्षभरानं त्यानं बांग्लादेशविरुद्धच्या कसोटीत संघाचं प्रतिनिधीत्व केलं. सर्वात कमी वयात कसोटी संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू होण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.