बुलडाणा : बहुजननामा ऑनलाईन – अखिल लोहार, गाडी लोहार समाज विकास संस्थेच्या वतीने सथानिक महात्मा ज्योतीबा फुले माध्यमीक शाळेत लोहारा समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक विषयांवर या मेळाव्यात चर्चा करण्यात आली. शिवनारायण पोफळघट यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी अखिल लोहार, गाडी लोहार समाज विकास संस्थेचे अध्यक्ष कुमार थोरात होते. यावेळी संघटक पंडीतराव पडघमकर, राज्य सचिव दिलीप वसव, राम अंकुशकर, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष दामोधर बिडवे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष डी. आर. माळी, लोहार समाज संघटनेचे माजी अध्यक्ष प्रकाशराव सुरडकर, उपाध्यक्ष प्रा. विश्वासराव लोहार, समाधान ढोले, डॉ. गायत्री सावजी, निर्मला पोफळघट, गजानन वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सचिव दिलीप वसव यांनी सांगितले की, लोहार समाज हा स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत बीकट परीस्थीतीत जीवन जगत आहे.
समाजाच्या विविध अडचणी कशा सोडविता येतील या दृष्टीने विचार करून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी दामोधर बिडवे, डी. आर. माळी, प्रा. विश्वासराव लोहार, राम अंकुशकर,बंडोपंत पडघमकर यांनी देखील मार्गदर्शन केले. डॉ.गायत्री सावजी यांनी समाजहितासाठी सर्वांनी योगद्यान द्यावे, असे आवाहन केले. तर कुमार थोरात यांनी समाजातील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन यशस्वी होत समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले. सुरुवातीला प्रकाशराव सुरडकर यांनी प्रास्ताविकातून लोहार समाज संघटनेच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षापासून केलेल्या कार्याचा आढावा मांडला. गजानन वाघ यांची अखिल लोहार समाज विकास संस्थेच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सूत्रसंचालन धनंजय चाफेकर तर आभार समाधान ढोले यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी दिलीप हरेकर, गोपाल कोषे, जीवन पोफळकर, हरिभाऊ गाडेकर, बंडु पोफळकर, अंकुश सुरडकर, श्रीकृष्ण वाघ, दिपक पोफळघट, दादाराव फोफळकर, रत्नाकर पोफळकर, शिवाजी जाधव, पांडुरंग वाघ, समाधान गव्हाणे, विशाल ढोले, उषाबाई पोफळकर लक्ष्मी वाघ, सुरडकर यांनी परीश्रम घेतले.