इंदापूर प्रतिनिधी…सुधाकर बोराटे. – वारकरी सांप्रदायाचे जेष्ठ संत, संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांची ७२४ वी पुण्यतिथी इंदापूर (सावता माळीनगर) येथिल संत सावता माळी मंदिरात मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली.यावेळी संत सावता महाराज पुण्यतीथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याचे किर्तन ह.भ.प. रामभाऊ महाराज अभंग यांचे किर्तनाने व उपस्थितांना महाप्रसादाचे भोजन देऊन करण्यात आली.
श्री.संत सावतामाळी महाराज यांचे पुण्यतिथिचे औचित्य साधुन सालाबादप्रमाणे याही वर्षी संत सावतामाळी मंदीरामध्ये दिनांक २४ ते ३१ जुलै दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त इंदापूरकरांच्या वतीने करण्यात आले होते.दि.३१ रोजी अखंड हरिनाम सप्ताह सांगता व संत सावता महाराज पुण्यतीथी निमित्त सकाळी आठ वाजता सावतामाळी मंदीर येथुन सावतामाळी महाराज प्रतीमेची रथातुन व पालखी मिरवणूकीस टाळ-मृदुगाच्या गजरात सुरूवात करण्यात आली. पालखी नेहरू चौक,खडकपूरा हणूमान मंदिर व परत खडकपूरा,तेलीगल्ली मार्गे दर्गाह मस्जिद चौक ते सावतामाळी मंदीर मार्गे पुन्हा सावतामाळी मंदीर येथे मिरवणूक सांगता झाली.
बुधवार दुपारी ठीक १२ वाजता सावतामाळी महाराज पुण्यतिथी निमीत्त फुले टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.या सप्ताह सोहळ्यात व्यासपिठ चालक म्हणून ह.भ.प.जगदाळे,ह.भ.प.अच्युत महाराज राऊत यांनी काम पाहीले.तर काकडा नेतृृत्व देवकाते महाराज व सुनिल महाराज बारवकर यांनी केले. सप्ताहामध्ये नारायण महाराज भोंग( विठ्ठलवाडी),ओंकार महाराज जौंजाळ (इंदापूर),गुरूमाऊली हरिदास बोराटे महाराज,लाला महाराज चोपडे (शहा),ढगे महाराज,रणखांबे महाराज,पायगन गुरूजी महाराज (बार्शी यांची कीर्तने संपन्न झाली. यावेळी इंदापूर नगरीच्या प्रथम नागरिक व नगरपरिषद नगराध्यक्षा अंकिता शहा यांचा आयोजकांच्या वतीने शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.