बहुजननामा ऑनलाईन टीम : उत्तर प्रदेशमधील बस्ती येथे भाजप नेते कबीर तिवारी यांच्या हत्येप्रकरणी तत्कालीन एसपी पंकज कुमार यांच्याविरूद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या खुनाच्या प्रकरणाचा तपासात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेनंतर पंकज कुमार यांना बस्तीमधून काढून डीजीपी कार्यालयात जोडण्यात आले आहे.
यूपी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि, पंकज कुमार यांनी कामात हलगर्जीपणा दाखविला आहे, त्याशिवाय परिस्थितीशी सामना करण्यासाठी त्यांनी प्रभावी कारवाई केली नाही. या घटनेशी संबंधित त्याचे दुर्लक्ष दिसून येते. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पंकज कुमार हे उत्तरदायित्व न घेता दोषी ठरले आहेत. यानंतर अखिल भारतीय सेवा (आचार) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरूद्ध विभागीय कार्यवाही केली जाईल.
दरम्यान ९ ऑक्टोबर रोजी एपीएन पीजी महाविद्यालयासमोर काही अज्ञात व्यक्तीने दिवसाढवळ्या कबीर तिवारी यांना गोळ्या घातल्या होत्या. नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांचे समर्थक हिंसाचाराकडे वळले. या लोकांनी यूपी रोडवेजच्या बसेसची तोडफोड केली आणि सरकारी मालमत्तेचे नुकसानदेखील केले आहे. पोलिस चौकीत ठेवलेल्या फर्निचरलाही पेटवून दिले.
Visit : bahujannama.com