बहुजननामा ऑनलाईन टीम : सध्या चर्चेत असणाऱ्या पंजाब अँड महाराष्ट्र क्वॉपरेटिव (PMC) बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी बँकेचे निलंबित एमडी जॉय थॉमस यांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित एक मोठा खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात जॉय यांनी सांगितले कि, २००५ साली त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारत त्यांच्या सेक्रेटरीसोबत विवाह केला होता. तसेच मिळालेल्या माहितीनुसार , जॉय यांनी लग्न केलेल्या महिलेच्या नावावर पुण्यात ९ फ्लॅट नावावर होते. दरम्यान, जॉय थॉमस पीएमसी बँकेच्या ४,३३५ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी जेल बंद आहे. तसेच त्यांच्यासोबत रिअल इस्टेट ग्रुपचे HDIL चे प्रमोटर राकेश वधावन, मुलगा सारंग आणि बँकेचे माजी चेअरमन वैराम सिंग हे देखील आरोपी म्हणून सिद्ध झाले आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जॉय थॉमस हे दुहेरी आयुष्य जगत होते, त्यांना पत्नी आणि एक मुलगा असूनही जॉय यांचे आपल्या सेक्रेटरीसोबत संबंध कायम ठेवले होते. २००५ साली त्या सेक्रेटरी महिलेने आता मी लग्न करणार आहे आणि दुबईला शिफ्ट होणार आहे असे सांगून आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता.
परंतु ती दुबईला न जाता पुण्याला शिफ्ट झाली होती, त्यानंतर जॉय यांच्याशी लग्न करून ते दोघेही वैवाहिक जीवन जगत होते, जॉय हे इस्लाम धर्म स्वीकारत जुनैद बनले, त्या दरम्यान त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने प्रॉपर्टी देखील खरेदी केली होती. जर याचा संबंध बँकेच्या घोटाळ्याशी संबंधित निघाला तर हि प्रॉपर्टी जप्त करण्यात येणार आहे. जॉय हे पुण्यावरून ये-जा करत होते, पुण्यातील त्यांची प्रॉपर्टी त्यांनी कशी खरेदी केली या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे, जर काही संबंध असेल तर ती ४ करोड रुपयांची प्रॉपर्टी लवकरच जप्त करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे.
Visit : bahujannama.com