सिडनी : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी बलात्कार प्रकरणामुळे ऑस्ट्रेलिया संसद चर्चेत आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा संसदेतील एका नव्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. संसदेतील एक व्हिडीओ लीक झाला असून त्यामध्ये खासदार आणि कर्मचारी सेक्स, हस्तमैथुन करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या घटनेमुळे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या सरकार विरुद्ध लोक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारवर आरोपांच्या फैरी झडत असतानाच सरकारने एका कर्मचा-याला बडतर्फ केले आहे.
ऑस्ट्रेलियाची संसद हि व्यभिचाराचा अड्डा बनला आहे. संसदेच्या प्रार्थनागृहात सेक्स रॅकेट सुरु होत. खासदारांसाठी सेक्स वर्कर्सना बोलावले जात होते. या प्रकारात काही कर्मचारीही सहभागी होते. एका लीक झालेल्या व्हिडीओमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सरकारने एका कर्मचाऱ्याला बडतर्फ केले असून या प्रकणाच्या सखोल चौकशीचे आश्वसन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना द्यावे लागले. परंतु यामुळे विरोधकांवर काहीही फरक पडला नसल्याचे दिसत आहे कारण अशा प्रकरणामध्ये सरकार अडकले आहे. एका व्यक्तीचा हवाला देत वृत्तपत्र द ऑस्ट्रेलियन आणि चॅनल १० ने हे प्रकरण उघडकीस आणले.
फेसबुक मेसेंजर सेक्स रॅकेटमध्ये सामील झालेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रुप तयार केला होता. संसदेमध्ये लैंगिक कृत्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ या ग्रुपवर शेअर केली जातात. या ग्रुपशी संबंधित व्यक्ती, जयनाई हे प्रकरण उघडकीस आणले त्याच्या म्ह्णणण्यानुसार बरीच छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केली जात होते. काही काळानंतर त्याने या अश्लिल प्रकाराकडे लक्ष देणे बंद केले. समोर आलेल्या व्हिडिओंपैकी एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका महिला खासदारांच्या डेस्कवर हस्तमैथुन करताना दिसत आहे. केवळ सरकारी कर्मचारीच खासदारही यामध्ये सामील होते. लैंगिक उपक्रमांसाठी ते संसद भवनातील प्रार्थना कक्ष वापरत. संसद भवनात सेक्स वर्कर्स सरकारच्या काही खासदारांसाठी आणल्याचा दावा व्हिसलब्लोअरने केला आहे. अलिकडच्या काळात अनेक लैंगिक घोटाळ्यांमध्ये लिबरल-नॅशनल युती सरकार अडकले आहे. काही दिवसापूर्वी तीन महिलांनी सत्तारूढ लिबरल पक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या इतर सदस्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. संरक्षणमंत्री लिंडा रेनोल्ड्स यांच्या स्टाफ मेंबर असणाऱ्या ब्रिटनी हिंगिस या पीडित महिलेने गेल्या महिन्यात सांगितले होते की २०१९ मध्ये तिच्यावर एका मंत्र्यांच्या संसदीय कार्यालयात बलात्कार झाला होता. ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा कायदा अधिकारी ऍटर्नी जनरल खिश्चियन पोर्टरवरही बलात्काराचा गुन्हा याच महिन्यात दाखल करण्यात आला होता. १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा १९८८ मध्ये पोर्टरवर आरोप होता. पोर्टर त्यावेळी १७ वर्षांचा होता. या खटल्याच्या वृत्तानंतर ऑस्ट्रेलियात ठीक ठिकाणी लोकांनी निदर्शन केले. अलीकडेच, १५ मार्चच्या जनमत सर्वेक्षणात मॉरिसन सरकारचे रेटिंग घटले होते. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या ग्रींस पार्टीच्या खासदार लिडिया थॉर्पे यांनीही आपल्यावरील लैंगिक छळाचा खुलासा केला. चार नेत्यांनी गेल्या सहा महिन्यांत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केला. हे लोक आपले कायदे बनवतात. असे ट्विटही लिडिया यांनी केले आहे.
देशभरात तीव्र निदर्शने…
या घटनेनंतर ऑस्ट्रेलियातील लोक रस्त्यावर उतरले आहेत. निदर्शने सुरु असून यामध्ये महिला खासदारांचाही समावेश आहे. या संपूर्ण प्रकरणाची सरकारने चौकशी केली पाहिजे, असे मंत्री मेरीस पायने यांनी म्हटलं आहे. दरम्यान लोकांचा आक्रोश आणि सरकार विरोधात वाढत चाललेली नाराजी टाळण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे सरकारने जाहीर केले आहे.