बहुजननामा ऑनलाइन टीम – देशातील दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या वोडाफोन आणि आयडिया एकत्र येत आता VI बनली. वोडाफोन आणि आयडिया कडून आता १०० जीबी हाय स्पीड डेटा प्लॅन ऑफर करण्यात येत आहे. प्रीपेड प्लॅन मध्ये आता कंपनीने नवीन प्लान ॲड केला आहे. त्याला अधिकृत साईट वर लिस्ट करण्यात आले आहे. VI आता दोन वर्क फ्रॉम होम प्लानने रिचार्ज करण्याचे ऑप्शन आपल्या युजर्संना देत आहे. VI वर शेअर करण्यात आलेल्या प्लॅन लिस्टनुसार ३५१ रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लॅनची ५६ दिवसांची वैधता आहे.या दरम्यान युजर्संना एकूण १०० जीबी हायस्पीड डेटा ऑफर केला जातो.आता पर्यंत २५१ रुपयांच्या वर्क फ्रॉम होम प्लॅनच्या तुलनेत यात डबल बेनिफिट्स मिळत आहेत.
कोणत्या सर्कलमधील युजर्संचा फायदा
नवीन ३५१ रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लॅनमध्ये अनेक आकर्षक ऑफर दिले जात आहे. यासाठी कस्टमर्संना १०० रुपये मोजावे लागणार आहे. ज्या युजर्संना जास्त डेटाची गरज आहे. किंवा जे घरून काम करतात त्यांच्यासाठी ३५१ रुपयांचा प्लॅन जबरदस्त आहे.सध्या हा प्रीपेड प्लॅन आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात, केरळ आणि मध्य प्रदेशच्या सर्कलमध्ये ऑफर करण्यात आला आहे.
वोडाफोन-आयडिया आता VI
VI कडून ३५१ रुपयांचा प्लॅन नंतर बाकीच्या सर्कलमध्ये रोलआउट केला जावू शकतो.आता सगळे ब्रँड आपल्या प्लॅन्स मध्ये बदल करत आहेत. तसेच रिचार्ज पोर्ट्ल्सवर लवकरच नवीन प्लान्स लिस्ट करण्यात येईल. आधी वोडाफोन आयडिया दोन्ही युजर्सला एक सारखे प्लान्स मिळत होते. आता एकसारखे बेनिफिट्स सुद्धा देण्यात येणार आहे.