बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. अनेक उद्योग-धंदे बंद असल्याने तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा परिस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध पदांसाठी जम्बो भरती निघाली आहे. सातवी पास ते पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही पदे केवळ 11 महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहेत. जाणून घ्या पदाचा तपशिल, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया.
प्रोड्युसर टेक्निकल – 1 जागा
– पदव्युत्तर पदवी मीडिया/मास्टर इन कम्युनिकेशन विथ व्हिडीओ प्रोडक्शन किंवा
– पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा सिनेमाग्राफी/एडिटिंग नॅशनल लेव्हल इन्स्टिट्यूट मधून पूर्ण असावा
– टेक्निकल नॉलेज – डिजिटल व्हिडीओ कॅमेरा, नॉन लाइनर एडिटिंग आणि संगणकाचे ज्ञान
– 30 वर्षापेक्षा अधिक असू नये
– प्राध्यापकांसाठी 40 वर्ष वयोमर्यादा
– D.O.E.O/C.C.C आणि ‘O’ शिक्षणाचे ए, बी, सी दर्जाचे प्रमाणपत्र
– एमएससीआयटी किंवा जीईसिटी प्रमाणपत्र आवश्यक
स्टेडियम मॅनेजर – 1 जागा
– इंडोर हॉल मधील खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र (आंतरविद्यापीठ/राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय)
– बास्केटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, हँडबॉल, हॉलीबॉल, वेट लिफ्टिंग, बीपीएड, एमएससीआयटी आवश्यक
डाटा ऑपरेटर – 3 जागा
– एमएससी कॉम्प्युटर/बीसीए/बीएससी कॉम्प्युटर सायन्स सेकंड क्लास उत्तीर्ण
– डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजीनियरिंग प्रथम श्रेणीत पास
– 3 वर्षे काम केल्याचा अनुभव असावा
प्राणी गृहपाल -1 जागा
– बी फार्म/बीएससी प्राणि शास्त्र
– 6 महिने शासकीय मान्यता प्राप्त प्राणी गृहात काम केल्याचा अनुभव
प्रयोगशाळा सहाय्यक – 3 जागा
– इलेक्ट्रॉनिक पदविका किंवा बीएससी फिजिक्स इलेक्ट्रॉनीक्स
– अनुभव असल्यास प्राधान्य
– डी.ओ.ई.ओ/सी.सी.सी आणि ‘ओ’ शिक्षणाचे ए, बी, सी दर्जाचे प्रमाणपत्र
-एमएससीआयटी किंवा जीईसिटी प्रमाणपत्र आवश्यक
NMR एक्सपोर्ट – 1 जागा
-एम. एसस्सी आणि दोन वर्ष एनएमआर काम केल्याचा अनुभव
-एम.एसस्सी आणि पीएचडी
शिक्षण समन्वयक
– पदव्युत्तर पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठातून घेतलेली असावी
– संबंधीत विषयात नेट-सेट उत्तीर्ण
अधीक्षक – 1 जागा
– कमीत कमी पदव्युत्तर, पदवीला एक विषय संगणकाशी संबंधित असावा
– मराठी टंकलेखन 30, इंग्रजी 40
– एमएसवर्ड, एक्सेल, ग्राफिक्स यांचे ज्ञान
– मराठी व इंग्रजी भाषेतून संगणकाद्वारे संभाषण साधता येणे आवश्यक
– वसतीगृहाच्या व्यवस्थापकाचा अनुभव असल्यास प्राधान्य
अधीक्षिका – 1 जागा
– कमीत कमी पदव्युत्तर, पदवीला एक विषय संगणकाशी संबंधित असावा
– मराठी टंकलेखन 30, इंग्रजी 40
– मराठी व इंग्रजी भाषेतून संगणकाद्वारे संभाषण साधता येणे आवश्यक
– वसतीगृहाच्या व्यवस्थापकाचा अनुभव असल्यास प्राधान्य
असिस्टंट प्रोड्युसर – 1 जागा
– पदव्युत्तर पदवी मीडिया/ मास्टर इन इलेक्ट्रॉनिक मीडिया, कम्युनिकेशन विथ व्हिडीओ प्रोडक्शन किंवा
– पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा सिनेमाग्राफी/एडिटिंग नॅशनल लेव्हल इन्स्टिट्यूट मधून पूर्ण असावा
– टेक्निकल नॉलेज – डिजीटल व्हिडीओ कॅमेरा, नॉन लाइनर एडिटिंग आणि संगणकाचे ज्ञान
प्रयोगशाळा सहाय्यक -8 जागा
– विज्ञान शाखेचा पदवीधर किंवा डी फार्मसी
– अनुभव असल्यास प्राधान्य
– एमएससीआयटी
प्रयोगशाळा सहाय्यक – 4 जागा
– विज्ञान शाखेचा पदवीधर संगणक विषय घेऊन उत्तीर्ण
– बीसीए/कम्प्युटर डिप्लोमा
– अनुभव असल्यास प्राधान्य
– एमएससीआयटी
फर्मासिस्ट – 1 जागा
– डी. फार्म/ बी फार्म उत्तीर्ण
– उमेदवाराचे रजिस्टर ऑफ फर्मासिस्ट असणे आवश्यक
– एमएससीआयटी उत्तीर्ण
फर्मासिस्ट/तंत्रज्ञ – 1 जागा
– डी. फार्म/बी फार्म उत्तीर्ण
कनिष्ठ ग्रंथफाल सहाय्यक – 1 जागा
– ग्रंथालय शास्त्रातील पदवी द्वितीय श्रीणीत उत्तीर्ण
– ग्रंथालय कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य
– उमेदवाराचे रजिस्टर ऑफ फर्मासिस्ट असणे आवश्यक
– एमएससीआयटी उत्तीर्ण
अंगरक्षक – 1 जागा
– पोलीस दल, भारतीय सैन्य दल, सुरक्षा दलातील सेवानिवृत्त कर्मचारी
– सुरक्षारक्षक म्हणून 5 वर्षांचा अनुभव असावा
वाहनचालक – 2 जागा
– सातवी उत्तीर्ण
– हलके व जड वाहन चालवण्याचा परवाना
– 5 वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव
प्रयोगशाळा परिचर – 7 जागा
– बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण
परिचारिका – 1 जागा
– अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा
व्हेटरर्नरी – 1 जागा
– डिप्लोमा इन व्होटर्नसरी सायन्स मान्यताप्रापत् विद्यापीठातून उत्तीर्ण
– इंडियन व्हेटर्नरी कौन्सिल मान्यता असावी
मुख्य कार्यकारी अधिकारी – 1 जागा
– एमबीए आणि 10 वर्षाचा अनुभव
अॅनिमल हऊस किपर – 1 जागा
– बी फार्म/बी.एसस्सी प्राणी शास्त्र किंवा लाईफ सायन्स
– 6 महिन्याचा अनुभव
अॅनिमल हाऊस अटेंडन्स – 1 जागा
– 12 वी सायन्स
– 6 महिन्याचा अनुभव
ग्राउंड्समॅन – 1 जागा
– 10 वी उत्तीर्ण
– राज्यस्तरीय, जिल्हा स्तरीय मैदानी खेळाचा खेळाडू असावा
– 3 वर्षाचा क्रिकेट व इतर मैदानी खेळाचे क्रीडांगण आखण्याचा अनुभव
– मैदानी निगा राखण्याचे ज्ञान आवश्यक
– मैदानी खेळाच्या स्पर्धा आयोजनाचा अनुभव
समन्वयक स्पर्धा परीक्षा – 1 जागा
– MSW/MA, MSc, M.Com
– MPSC अभ्यासक्रम शिकवण्याचा अनुभव
लिपिक संगणक चालक – 1 जागा
– कोणत्याही शाखेचा पदवीधर
– मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी 40
– एमएससीआयटी उत्तीर्ण
– बी. लीप प्राधान्य
कनिष्ठ लिपिक
– कोणत्याही शाखेच पदवीधर
– मराठी टंकलेखन 30 आणि इंग्रजी 40
– एमएससीआयटी उत्तीर्ण
लघुलेखक श्रेणी
– कोणत्याही शाखेचा पदवीधर
– लघुलेखक इंग्रजी व मराठी 10 श.प्र.ति. प्रमाणपत्र
– टंकलेखन इंग्रजी 40, मराठी 30 श.प्र.ति. प्रमाणपत्र
– एमएससीआयटी
शिपाई – 1 जागा
– दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा
– उमेदवाराचे सर्वसाधारण वय 18 वर्षे पूर्ण असावे
– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षे
– मागासवर्गीय उमेदवारांना 43 वर्षे
– अपवाद मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी वयोमर्यादा कमीत कमी 40 ते जास्तीत जास्त 65
अर्ज कसा करावा
विद्यापीठाच्या www.srtmun.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Recruitments वर क्लिक करावे. यानंतर जाहिरात दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर जाहिरात ओपन होईल. जाहिरातीच्या शेवटी अर्जाचा नमुना दिला आहे. तो नमुना स्वत:च्या हस्ताक्षरात किंवा टंकलिखित करुन पोस्टाने पाठवायचा आहे. त्यासोबत शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव, वयाच्या पुराव्यासाठी दहावीची सणद जोडावी.
अर्ज करण्याचा पत्ता
मा. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णूपूरी, नांदेड
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23 सप्टेंबर 2020