नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूक 2020साठी भाजपाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसर्या यादीत भाजपाने दिल्ली निवडणुकीसाठी 10 उमेवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपाने नवी दिल्लीच्या जागेसाठी सुनील यादव यांना तिकिट दिले आहे. भाजपाने दुसर्या यादीत नांगलोई जाटमधून सुमनलता शौकीन, राजौरी गार्डनमधून रमेश खन्ना, हरी नगरमधून तेजिंदर पाल बग्गा, दिल्ली कँटमधून मनीष सिंह, नवी दिल्लीतून सुनील यादव, कस्तूरबा नगरमधून रविंद्र चौधरी, महरौलीमधून कुसुम खत्री, कालकाजीतून धर्मवीर सिंह, कृष्णा नगरमधून अनिल गोयल आणि शाहदरामधून संजय गोयल यांना उमेदवारी दिली आहे.
Bharatiya Janata Party (BJP) releases another list of 10 candidates for the #DelhiElections2020. Tajinder Pal Bagga to contest from Hari Nagar constituency. pic.twitter.com/I61TvNuBzu
— ANI (@ANI) January 20, 2020
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यावेळी सुद्धा नवी दिल्ली जागेसाठी निवडणूक लढत आहेत. आपल्या पहिल्या यादीत भाजपा नवी दिल्लीच्या जागेसाठी उमेदवार ठरवू शकली नव्हती. परंतु, भाजपाने आता केजरीवाल यांच्या विरोधातील उमेदवार घोषित केला आहे. केजरीवाल यांच्याविरोधात सुनील यादव यांना उमेदवारी मिळाली आहे. सुनील यादव दिल्ली भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. दिल्ली निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आपल्या 70 उमेदवारांची घोषणा केली आहे. तर भाजपाने पहिल्या यादीत 57 उमेवारांची नावे अंतिम केली आहेत. तर दुसर्या यादीत भाजपाने आणखी 10 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत 54 तर दुसर्या यादीत 7 उमेदवारांची घोषणा केली आहे.
कधी होणार मतदान
दिल्ली निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी आहे. 22 जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर 24 जानेवारीपर्यंत उमेवारी अर्ज मागे घेता येईल. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर निकाल 11 फेब्रुवारीला आहे.
Visit : Bahujannama.com