मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजपचे ज्येष्ठ नेतेआणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझे तिकीट कापले, असा दावा खडसे यांनी केला आहे. तसेच ‘मी शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि सेनेचे नेतेही माझ्या संपर्कात होते,’ असेही खडसे म्हणाले आहते.
खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात असून संपर्कात असणाऱ्या नेत्यांची संख्या मात्र सांगू शकत नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. त्याबद्दल चर्चा चालू असताना खडसे यांनी त्याचा खुलासा केला.मी भाजप सोडू शकतो किंवा जाऊ शकतो असं म्हटलं नव्हतं, मी संन्यासही घेऊ शकतो. तर पक्षाने माझ्या मागणीची नोंद घेतली याचे समाधान आहे.
मला न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणार, असे खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. मी शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांचे नेतेही माझ्या संपर्कात होते, हे सत्य असल्याचे खडसे म्हणाले. खडसे यांच्या या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्याला चालना मिळाली असल्याची चर्चा रंगत आहे.
Visit : bahujannama.com