बार्शी : बहुजननामा ऑनलाईन – निवडणुका जवळ आल्या की अनेक नेते एकमेकांवर टिका करत असता. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका करतांना केलेल्या हातवाऱ्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शरद पवार यांनी सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच नसल्याच्या या टीकेला शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भाषणाच्या सुरवातीपासूनच त्यांनी भाजप- शिवसेनेवर टीका करण्यास सुरवात केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका प्रचारसभेत शरद पवार यांच्यावर टीका केली होती की, ‘विरोधक थकले आहेत. आमच्याशी कुस्ती लढायला समोर कुणीच नाही,’ त्या टीकेवर शरद पवार प्रत्युत्तर देत म्हणाले की, ‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘अशांशी’ होत नाही.’
ही टीका करतांना शरद पवारांनी हातवारे केले आणि त्यांच्या भाषणाचे चित्रण करणाऱ्या टीव्ही कॅमेऱ्यांनी ते हातवारे टिपले आणि पूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. भाजपने यावर प्रतिक्रिया दिली की, ‘इतकी वर्षे राजकारणात असलेल्या माणसानं असं करणं शोभत नाही. त्यांचा तोल आधीच गेलाच होता, आता पराभवाच्या भीतीनं ते अधिकच बिथरले आहेत,’ अशी टीका भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण यांनी केली.
Visit : bahujannama.com