नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशाची राजधानीत महिला सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीची पर्स चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पर्समध्ये रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे समजते. दिल्लीतील उच्चभ्रू परिसरातील या घटनेमुळे तेथील सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे.
शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाची मुलगी दमयंती बेन मोदी अमृतसर हून दिल्लीत आल्या होत्या. त्या दिल्लीतील सिव्हील लाइन्स परिसरातील गुजराती समाज भवनमध्ये राहणार होत्या. भवनाच्या गेटवर पोहोचल्यानंतर त्या रिक्षातून उतरत असताना पाठीमागून दोन अज्ञात व्याक्तीनी स्कूटीवर येत दमयंती यांच्याकडील पर्स हिसकावून नेली. काही समजण्याच्या आतच चोरटयांनी तेथून पळ काढला.
त्यांच्या पर्समध्ये ५६ हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाइल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे देखील असल्याची माहिती दमयंती दिली. त्यांना आज सायंकाळी दिल्लीवरून पुन्हा अहमदाबादला जायचे होते. परंतु, त्यांची पर्स चोरीला गेल्याने कागदपत्रेदेखील गेली आहेत. पोलिसांनी अज्ञांत व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तपास करीत आहेत. दरम्यान सिव्हिल लाइन्स हा परिसर उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. घटनेच्या नजीकच्या अंतरावर दिल्लीच्या उपराज्यपालांचे तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे. दिवसाढवळ्या अशी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Visit : bahujannama.com