नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आजकाल सेल्फी काढण्याचं फॅड आलं आहे. हे सेल्फी घेण्याचं वेड फक्त तरुण-तरुणींनाच नाही तर आजी-आजोबांना देखील लागले आहे. अश्याच हौशी आजोबांना सेल्फी घेण्याचं वेड त्यांच्या जीवावर बेतलं आहे. माथेरानला फिरायला गेल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरल्याने आजोबा ४०० फूट खोल दरीत कोसळले. परंतु, नशीब बलवत्तर म्हणून ते या अपघातातून बचावले. स्थानिक बचाव पथकाला त्यांना दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे असून त्यांना किरकोळ जखम झाली आहे.
अजित प्रभाकर बर्वे (वय ५८) असं या आजोबांचं नाव असून ते मुंबईतील विलेपार्ले येथील रहिवासी आहेत. दोन दिवसापूर्वी ती माथेरानला फिरण्यासाठी आले होते. बुधवारी ते सकाळी ९.३० च्या सुमारास सेल्फी पॉइंट (इको पॉइंट) वर फिरण्यासाठी गेले असता ते सुरक्षा कठडे ओलांडून दरी पाहत होते तसेच मोबाइलवर सेल्फी काढत होते त्यावेळी त्यांचा तोल गेला आणि ते ४०० फूट खाली दरीत कोसळले. पण त्यांचं नशीब म्हणून ते डोंगराच्या मध्यावर अडकून पडले. त्यानंतर ‘वाचवा वाचवा’ असे मदतीची ओरडू लागले. हा प्रकार पोलिसांना समजताच घटनास्थळी धाव घेत आजोबांना रेस्क्यू टीमच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले, अशी माहिती माथेरान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी दिली.
दोरीच्या सहाय्याने दरीत उतरून तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर बर्वे यांना सुखरूप बाहेर आणण्यात सह्याद्री रेस्क्यू टीमला यश आले. सह्याद्री रेस्क्यू बचाव पथकातील सुनील कोळी, अमित कोळी, सुनील ढोले, उमेश मोरे, अक्षय परब, अमोल सपकाळ यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
Visit : bahujannama.com