मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरोधात रोष व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांनाच संताप आता दिसून येत आहे. ‘गोपीचंद पडळकरांना जोड्यांनी मारा आणि ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळवा ! अश्या पद्धतीचे बॅनर जालन्यातील जय भीम सेना संघटनेने लावलेले आहेत. जय भीम सेने संघटनेने हे ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जो कोणी व्यक्ती पडळकरांना चपलेने मारेल त्याला हे ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे बॅनर लावत पडळकर यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हंटले होते कि, ‘गोपीचंद पडळकर तुम्ही धनगर समाजाच्या डोळ्यात धूळ फेकू शकत नाही, त्यांच्याशी गद्दारी करू शकत नाही, कारण तुम्ही सांगितले होते कि, धनगर समाजाला जोपर्यंत एसटी प्रवर्गाचा दाखल आणि आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत भाजपच्या नेत्याचे तोंडही पाहणार नाही. मग जर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात भाजपच्या पदाधिकाऱ्याला बोलवणार नव्हता मग पदासाठी आणि सत्तेसाठी हि गद्दारी का ? असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान ,आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला. आपण आज पासून वंचितचे कामकाज थांबवणार असल्याचे पडळकर यांनी जाहीर केले. महत्वाचे म्हणजे पक्षाच्या अंतिम उमेदवारांची यादी पडळकर यांनीच तयार केली होती.
Visit : bahujannama.com