नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी करत पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. अंतिम मुदतीपूर्वी आपण आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेला नसेल तर आपले पॅन कार्ड अवैध मानले जाईल.
प्राप्तिकर विभागाच्या आदेशानुसार, ३१ डिसेंबरनंतर आधारशी जोडले नसलेले कोणतेही पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. जुलै महिन्यात सादर झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात पॅन आणि आधार जोडणीचे नियम बदलण्यात आल्याचे स्पष्ट केले. २०१७ मध्ये सर्वप्रथम हा कायदा लागू करण्यात आला तेव्हा अधिसूचित तारखेपर्यंत पॅनला आधारशी जोडले गेले नाही तर पॅन अवैध होईल, असे त्यात म्हटले होते.
मनी लॉन्ड्रिंग पीएमएलए कायद्यांतर्गत बँक खाते, पॅनकार्ड आधार कार्डशी जोडणे केंद्र सरकारने आवश्यक केले आहे. जर असे केले नाही, तर त्यांचे पॅनकार्ड अवैध घोषित केले जाईल. दरम्यान , ज्या लोकांनी आधीच आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले आहेत, त्यांना कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची आवश्यकता नाही.
लिंक करण्याची प्रक्रिया :
पॅनकार्ड आधार कार्डशी जोडू इच्छित असल्यास प्रथम प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर जा.
यानंतर तुम्हाला वेबसाइटवर लिंक पर्याय दिसेल. आधार लिंकच्या पर्यायावर जा.
आधार लिंकच्या पर्यायावर जाताच एक नवीन विंडो उघडेल.
नवीन विंडो पृष्ठावर, आपल्याला आपला आधार क्रमांक, पॅन क्रमांक आणि आधारानुसार नाव भरावे लागेल.
या प्रकारानंतर कॅप्चा टाकुन आणि लिंक आधार बटणावर क्लिक करा.
Visit : bahujannama.com