औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असूनही अनेक पक्षनेते विरुद्ध पक्षांच्या नेत्यांची चढा -ओढ करण्यातच व्यस्त आहेत. त्यामुळे राजकीय हालचाली मंदावल्या आहेत. मात्र, दुसरीकडे आघाडी घेत एमआयएमने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. औरंगाबादमधील तीन मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा यावेळी पक्ष प्रमुख असुरुद्दीन ओवेसी यांनी केली. दरम्यान काही दिवसांपूर्वी एमआयएमने मुंबईतील पाच जागांसाठी आपल्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली होती.
वंचित बहुजन आघाडीसोबत सोडचिठ्ठी घेतल्यानंतर एमआयएम राज्यातील निवडणुकीसाठी जोरदार हालचाल करताना दिसत आहे. इतर पक्षांच्या तुलनेत कमी कालावधीत महाराष्ट्रातल्या राजकारणात चर्चेत असलेला एमआयएमने उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पक्षाने आपल्या पहिल्या यादीत मुंबईतील पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. यात कुर्ला विधानसभा मतदारसंघातून ज्ञानू डावरे, वांद्रे पूर्वमधून मोहम्मद सलीम कुरेशी, अणुशक्तीनगरमधून शाहवाज सरफराज हुसेन शेख, भायखळ्यातून आमदार वारिस पठाण, तर अंधेरी पश्चिममधून अरिफ मोईनुद्दीन शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबईनंतर आता औरंगाबादमधील तीन जागांसाठी उमेदवारांची नावाची घोषणा केली आहे. औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील हे लोकसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त कोण भरून काढणार याविषयी चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यावरचा पडदा दूर झाला आहे. एमआयएमने नासेर सिद्दीकी यांना उमेवारी दिली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद पूर्वमधून गफार कादरी यांना उमेदवारी दिली आहे. तसेच औरंगाबाद पश्चिमचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात एमआयएमने मागास कार्ड खेळत अरूण बोर्डे यांना उमेदवारी दिली आहे.
Praying for the success of our candidates from Aurangabad:
Aurangabad East: Dr Gaffar Quadri
Aurangabad Central: Mr Naser Siddiqui
Aurangabad West: Mr Arun Borde
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 27, 2019
Visit : bahujannama.com