पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | ऑनलाईन भाडे घेऊन लोहगाव येथे असताना चौघा चोरट्याने प्रवाशांला खाली उतरुन रिक्षाचालकाला मारहाण (Beating) केली. डोक्यात काठीने मारुन जखमी करुन मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन रिक्षा (Auto Rickshaw) घेऊन चोरटे पसार झाले. (Pune Crime News)
याप्रकरणी नईम मोहम्मद इद्रीस मलिक (वय २०, रा. कलवडवस्ती, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९४/२३) दिली आहे. हा प्रकार लोहगाव स्मशानभूमी येथे १३ जून रोजी रात्री साडेआठ वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक असून त्यांनी ओलावरुन ऑनलाईन भाडे
घेऊन लोहगावकडे जात होते. वाटेत चौघांनी त्यांच्या रिक्षा थांबविली.
रिक्षामधील प्रवाशांना जबरदस्तीने उतरवून त्यांनी रिक्षा लोहगाव स्मशानभूमी येथे घेण्यास लावली.
तेथे आल्यावर फिर्यादींना खाली उतरवून जवळ असलेले पैसे दे, असे म्हणून काठीने, हाताने, लाथाबुक्क्यांनी
मारहाण केली. काठीने त्यांच्या डोक्यात मारल्याने रक्त येऊ लागले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिर्यादीचा मोबाईल घेऊन जर तू पोलिसात तक्रार केली तर तुझ्याकडे बघून घेतो,
अशी धमकी देऊन ते रिक्षा घेऊन पळून गेले. त्यांच्या धमकीमुळे घाबरुन फिर्यादीने तक्रार दिली नव्हती.
शेवटी गुरुवारी त्यांनी विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Viman Nagar Police Station – The driver was beaten up and the
rickshaw was taken away with a mobile phone